Join us  

आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 1:43 PM

1 / 8
2023 हे वर्ष बघता बघता सरलं आणि 2024 उजाडलं. प्रत्येकाने आपापल्या प्रियजनांसोबत नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं. गेलं वर्ष बॉलिवूडसाठीही खूप खास ठरलं. अनेक चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.
2 / 8
आलिया, दीपिका, कतरिना आणि किआरा या सध्याच्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. शिवाय चौघीही त्यांचं लग्न आणि करिअर असं दोन्ही सांभाळत आहेत. काल एकाच दिवशी चौघींनी त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि लाईक्स कमेंट्सचा वर्षाव झाला.
3 / 8
आलिया भटने पती रणबीर कपूर आणि लेक राहासोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं. २०२३ वर्षात रणबीर कपूरने Animal सारखा सुपरहिट सिनेमा दिला. तर आलियाला यंदा 'गंगूबाई' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शिवाय त्यांची लेक राहा एक वर्षाची झाली.
4 / 8
आलियाने त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो काल इन्स्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये तिचा आणि राहाचा फोटो सध्या खूपच व्हायरल होतोय. शिवाय रणबीर सोबतही ती रोमँटिक झालेली दिसत आहे.
5 / 8
दुसरीकडे कतरिनाने विकीसोबत राजस्थानमध्ये नववर्षाचं स्वागत केलं. तिचा नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस लूक फोटोंमधून दिसून आला. कतरिनाचा 'टायगर 3' सिनेमा सुपरहिट झाला. तर विकीने 'सॅम बहादुर' सिनेमातून हे वर्ष गाजवलं.
6 / 8
कतरिना आणि विकीने राजस्थानमध्ये क्वॉलिटी टाईम घालवला. कतरिना विकीच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेला पाठमोरा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. राजस्थानच्या थंडीत त्यांनी 'कोजी' पोज दिली आहे.
7 / 8
गेल्या वर्षात विवाहबंधनात अडकलेलं कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी. दोघांनी बर्फाच्छादित प्रदेशात नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. किआराने दोघांचा एक सेल्फी शेअर करत त्यांच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे.
8 / 8
अभिनेत्री दीपिका पदुकोणने नेहमीप्रमाणेच तिची हटके फोटोग्राफी दाखवत नवीन वर्षाचं स्वागत केलं. दीपिका नक्की कोणत्या ठिकाणी गेली होती हे मात्र तिने लपवलं. तसंच फोटोंमध्ये रणवीर सिंह दिसला नाही. तरी रणवीरने दीपिकाच्या पोस्टवर 'हाय बेस्टी' अशी कमेंट केली आहे.
टॅग्स :नववर्षआलिया भटकतरिना कैफदीपिका पादुकोणकियारा अडवाणीव्हायरल फोटोज्