Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 06:00 IST

1 / 6
बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदा वेश्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
2 / 6
रुपेरी पडद्यावर अशा प्रकारची भूमिका साकारणे आलियासाठी आव्हान आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींनी वेश्याची भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांनी या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
3 / 6
माधुरी दीक्षितने देवदास चित्रपटात चंद्रमुखी नामक वेश्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. या सिनेमात माधुरीसोबत ऐश्वर्या राय आणि शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता.
4 / 6
करीना कपूरने चमेली चित्रपटात वेश्याची भूमिका केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तिच्या कामाचे खूप कौतूक झाले होते.
5 / 6
रेखा यांनी उमराव जानमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले होते. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता.
6 / 6
मधुर भंडारकरच्या चाँदनी बार चित्रपटात अभिनेत्री तब्बूने वेश्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेच्या तयारीसाठी तब्बू पहिल्यांदा बिअर बारमध्ये गेली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
टॅग्स :आलिया भटतब्बूमाधुरी दिक्षितरेखाकरिना कपूर