आरतीच्या टीव्ही प्रवासाविषयी बोलायचे झाल्यास २०११ मध्ये आलेल्या ‘खतरो के खिलाडी सिजन-४’ ची ती विनर राहिलेली आहे. पुढे २०१३ मध्ये तिने ‘झलक दिखला जा’मध्ये सहभाग घेतला होता. या व्यतिरिक्त आरती ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ आणि ‘डर सबको लगता हैं’ यामध्येही झळकली आहे. त्याचबरोबर तिचे बॉलिवूड करिअरही लांबलचक आहे.
‘आवारा पागल दिवाना, लज्जा, तुमसे अच्छा कौन हैं, राजा भैया, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, शादी नंबर वन, सुख, तिसरी आंख, शूटआउट अॅट लोखंडवाला, पार्टनर, धूम-धडाका, मिलेंगे-मिलेंगे, हे बेबी’ आदि सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. पंजाबी इंडस्ट्रीमध्येही तिने ‘ब्याह-७० किमी’मध्ये काम केले आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ती इंडस्ट्रीमधून जणूकाही गायबच झाली आहे. आता गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करीत असलेल्या आरतीने तिचे काही बिकीनी फोटोज् सोशल मीडियावर शेअर केल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये आरती अतिशय स्टनिंग अवतारात दिसत आहे. आरतीचा हा हॉट अॅण्ड सेक्सी अंदाज सध्या तिच्या फॅन्ससाठी मात्र पर्वणी ठरला आहे. तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.