Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा पाकिस्तानात गेला होता अजय देवगण, काय होतं कारण? तो किस्सा चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:34 IST

1 / 10
बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगण आज केवळ भारतातच नाही, तर जगभरात आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. अजयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करतात.
2 / 10
पण तुम्हाला माहितीये का, की अजय देवगणला एकदा थेट पाकिस्तान गाठावं लागलं होतं. त्याच कारण होतं, अजयचा 'ओमकारा' हा चित्रपट.
3 / 10
२००६ मध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी शेक्सपियरच्या 'ओथेलो' या जागतिक दर्जाच्या नाटकावर आधारित 'ओमकारा' नावाचा एक चित्रपट बनवला. अजय देवगण, सैफ अली खान आणि करीना कपूर अशी तगडी फौज या चित्रपटात होती.
4 / 10
पण आश्चर्य म्हणजे, भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी थंड प्रतिसाद दिला. २५ कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट भारतात बजेटही वसूल करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर 'फ्लॉप' ठरला.
5 / 10
भारतात चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी पाकिस्तानात मात्र 'ओमकारा'ची आणि सैफच्या 'लंगडा त्यागी'ची क्रेझ निर्माण झाली. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय पाकिस्तानातल्या एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये पोहचला होता.
6 / 10
२००७ मध्ये अजय देवगण पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर गेला. 'लेट नाईट विथ बेगम नवाजिश अली' या वादग्रस्त आणि तितक्याच लोकप्रिय शोमध्ये अजयने हजेरी लावली होती.
7 / 10
यावेळी बेगम अलीने अजयला पत्नी काजोलसंदर्भात अनेक प्रश्न विचारून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याने सर्व प्रश्नाची हजरजबाबीपणे उत्तरं दिली होती.
8 / 10
पाकिस्तान दौऱ्यावबद्दल बोलताना अजय एका मुलाखतीत म्हणाला होता,'मला वाटलं नव्हतं की 'ओमकारा'ला पाकिस्तानात इतकं प्रेम मिळेल. मी पहिल्यांदाच इथे आलो आहे आणि इथले लोक माझ्या कल्पनेपेक्षा जास्त प्रेमळ आहेत. हा प्रतिसाद पाहून मी थक्क झालोय, माझ्याकडे शब्द नाहीत'.
9 / 10
अजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'दृश्यम ३'मधून पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच 'दृश्यम ३'ची नुकतीच अधिकृत घोषणा झाली आहे.
10 / 10
पुढील वर्षात २ ऑक्टोबर २०२६ रोजी 'दृश्यम ३' जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :अजय देवगणपाकिस्तान