ALSO READ : ‘ही’ अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात झाली होती वेडी; सुसाइड करण्याचा केला होता प्रयत्न!!
गतवर्षी आलेला अजयचा ‘शिवाय’ हा चित्रपट फ्लॉप झाला. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अजयच्या आईची प्रकृती ठीक नाही. यामुळे अजय चिंतीत आहे. ‘शिवाय’ हा चित्रपट स्वत: अजयने दिग्दर्शित केलेला होता. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला. त्यामुळे येत्या काळात अजयला त्याच्या आगामी चित्रपटांकडून बºयाच अपेक्षा आहेत. ‘गोलमाल4’ शिवाय ‘बादशाहो’ या चित्रपटातही अजय दिसणार आहे. ‘गोलमाल4’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या ‘खतरों के खिलाडी’च्या शूटींगसाठी स्पेनमध्ये आहे. त्यामुळे अख्ख्या ‘गोलमाल4’ टीमला सध्या काही दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. याच ब्रेकमध्ये अजय अजमेरला पोहोचला. याठिकाणी अजयने काय प्रार्थना केली, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण अजयची प्रार्थना पूर्ण होवो, त्याच्या मनासारखे घडो, अशीच कामना आम्ही करतो.
‘बादशाहो’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात सनी लिओनी हिचा आयटम नंबरही पाहायला मिळणार आहे. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ फेम डायरेक्टर मिलन लुथरिया हा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’चा सीक्वल आपटल्यानंतर मिलन लुथरिया फुंकून फुंकून ताक पित आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा लकी चार्म अजय देवगणला साईन केले आहे.