या चित्रपटात ऐश्वर्या दलबीर कौरची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात ऐश लाल रंगाच्या सलवार कमीसमध्ये दिसत असून चित्रपटातील एका गाण्यातील एक स्टिल फोटो आहे.
रणदीपही एका फोटोत दिसत असून तो अतिशय त्रासात आणि चिडलेल्या चेहºयावरील हावभावात तुरूंगात अडकलेला आहे. चित्रपटात याशिवाय रिचा चढ्ढा आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे.