श्रीदेवीची लाडकी जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्या मीडियाचे सगळे लक्ष जान्हवीकडे आहे. जान्हवी जिथे जाईल तिथे पापाराझी तिच्या मागावर असतात, त्याचे हेच कारण आहे. जान्हवी अलीकडेच तिचा कथित बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया याच्यासोबत दिसली होती. जान्हवी व शिखर दोघेही वांद्र्याच्या एका रेस्टॉरेंटमध्ये लंचसाठी पोहोचले होते. आता जान्हवी आणि शिखर दोघेही एकत्र म्हटल्यावर मीडियाच्या कॅमेºयांची क्लिक -क्लिक होणारच. पण मीडिया बाहेर उभा आहे म्हटल्यावर जान्हवीनेही हुशारी दाखवली. ती आणि शिखर दोघेही रेस्टारंटमधून निघताना वेगवेगळे निघाले. मीडियाकडे न बघता जान्हवी घाईघाईत आपल्या कारमध्ये बसली. तर शिखरही त्याच्या कारने आपल्या मार्गाने चालता झाला. जान्हवी व शिखर या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.
ALSO READ : जान्हवी कपूरच्या डेब्यूची तयारी झालीय सुरू!
OMG!! कुणासोबत दिसली जान्हवी कपूर?