Join us

​आघाडीच्या व चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 20:28 IST

 बॉलिवूड तसेच  हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने अलीकडेच  आपले चित्रपट प्रॉडक्शन हाऊस सुुरु केले आहे. त्याअंतर्गंत ...

 बॉलिवूड तसेच  हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने अलीकडेच  आपले चित्रपट प्रॉडक्शन हाऊस सुुरु केले आहे. त्याअंतर्गंत   चित्रपट करणेही  तिने सुरु केले आहे. तिच्यासारख्याच काही  आघाडीच्या अभिनेत्री असून, त्यासुद्धा चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. त्याची ही खास माहिती आपल्यासाठी. बघून कोण आहेत या अभिनेत्री .प्रियंका चोपडा : प्रियंका चोपडा ही अभिनेत्रीसोबतच निर्माताही बनली आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘पर्पल पेब्बल पिक्चर्स’ असे आहे. भोजपूरी भाषेत तिने  पहिला चित्रपट केला असून, त्याचे नाव ‘बम बम बोल रहा है काशी’ असे आहे. १० जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे अश्लीलता पसरत असल्यासह अन्य आरोप करण्यात आल्याने तो वादग्रस्त ठरला.अनुष्का शर्मा :‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने पर्दापण केले. ‘पीके’ यशस्वी व वादग्रस्त राहिलेल्या चित्रपटाचीही ती अभिनेत्री होती. अनुष्कानेही आपले प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे. ‘क्लीन स्लेट फिल्मस’ असे त्याचे नाव आहे. तिने या बॅनरखाली ‘एनएच 10’ या चित्रपट तयार केला होता. त्यावरुन खूप वाद होऊन, खाप पंचायतीने त्याला विरोध केला होता. नवदीप सिंहने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. शिल्पा शेट्टी :आपल्या ठुमक्यामुळे उत्तरप्रदेश व बिहारला लुटणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीही निर्माता बनली आहे. अलीकडेच तिने अभिनय करणे सोडले आहे. तिने आपल्या ‘एस्सेटिल स्पोर्टस अ‍ॅण्ड मीडिया या बॅनरखाली’ ‘ढिश्कियाऊं’ हा चित्रपट तयार करुन, चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.लारा दत्ता :विश्वसुंदरी राहिलेली लारा दत्ता सध्या चित्रपटात अभिनय करीत आहे. अलीकडे ती कमी चित्रपटात दिसत असून, मागील काही दिवसापासून तिने आपले ‘बिग डैडी प्रॉडक्शन’ सुरु केले आहे. त्याअंतर्गत ‘ चलो दिल्ली’ हा चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विनय पाठक सुद्धा आहे. अमिशा पटेल :‘गदर’ ही एक प्रेमकहाणी सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटात अमिशा पटेल अभिनेत्री होती. तिनेही प्रॉडक्शन हाऊस सुरु केले असून, त्याअंतर्गत स्वत: तसेच जायद खानचा लीड रोल असलेला ‘देशी मॅजिक’ हा चित्रपट केला आहे. प्रॉडक्शनला ‘अमिशा पटेल’ असे स्वत:  चे नाव तिने दिलेले आहे. या अभिनेत्रीही आहेत निर्माता निर्माता क्षेत्रात पर्दापण करणाºया अभिनेत्रीची संख्या ही  मोठी आहे. यामध्ये जुही चावला, दिया मिर्झा, प्रिती झिंटा, सुष्मिता सेन, मनीषा कोईराला, पूजा भट्ट आदींचा समावेश आहे. परंतु, पूजाशिवाय यामध्ये कुणीही यशस्वी झाल्या नाहीत. त्यांचे चित्रपट कधी आले व गेले हे सुद्धा कळाले नाही. यामधील जुही शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी रेडचिलीशी संबंधित आहे.