Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्याची मुलगी, ३८ वर्षीय अभिनेत्री आजही करतेय स्ट्रगल; सौंदर्यावर इंडस्ट्री फिदा पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:16 IST

1 / 9
बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. काहींना यश मिळालं तर काही इंडस्ट्रीतून गायबच झाले.
2 / 9
अशीच एक अभिनेत्री जिला इंडस्ट्रीत १८ वर्ष झाली. तिने इम्रान हाश्मी, रामचरण, अजय देवगण या स्टार्ससोबतही काम केलं. मातर् आजही तिला यशस्वी अभिनेत्री हा टॅग मिळालेला नाही.
3 / 9
ही आहे ३८ वर्षीय अभिनेत्री नेहा शर्मा. तिने फिल्म इंडस्ट्रीतील कटू सत्याचा खुलासा केला होता. यातून तिने अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या होत्या.
4 / 9
दोन वर्षांपूर्वी नेहाने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, 'कोणत्याही कलाकाराला कधी हे माहित नसतं की त्याला कधी आणि कोणत्या सिनेमासाठी फायनल केलं जाईल.'
5 / 9
'जर समजा ५ सिनेमांसाठी निवड प्रक्रिया सुरु असेल आणि तुम्ही पाचही ऑडिशन देऊ शकता. पण त्यातून तुम्हाला फक्त एकच सिनेमा मिळतो आणि तो तुमच्यासाठी योग्य वाटत नाही. याचा अर्थ हा नाही की तुमच्याकडे इतर शेकडो चांगल्या स्क्रिप्ट्स आहेत असं होणं कठीणच आहे.'
6 / 9
'माझ्याकडे पर्याय कमी होते. मला मर्यादित स्क्रिप्ट्समधूनच निवडलं जायचं. ज्यातील काही सिनेमांचा मलाच भाग होण्याची इच्छा नसायची तरी मला त्यात काम करायला लागायचं.'
7 / 9
नेहा शर्मा बिहारचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मुलगी आहे. तिने 'चिरुथा' या तेलुगू सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. यामध्ये रामचरणची मुख्य भूमिका होती. नेहाच्या सौंदर्यावर इंडस्ट्री फिदा आहे पण तिला म्हणाव्या तिला चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या नाहीत.
8 / 9
'एकदा मला खूप चांगला सिनेमा मिळाला होता. त्यासाठी मी फिटही होते. ३-४ वेळा प्रॅक्टिसही केली. सगळं काही चांगलं सुरु होतं पण शेवटी एका बड्या अभिनेत्रीने मला रिप्लेस केलं. मला नीट कारणही सांगण्यात आलं नाही.', असं ती म्हणाली.
9 / 9
इम्रान हाश्मीसोबत तिचा 'क्रू' सिनेमा आला होता. तो फारसा चालला नाही. यानंतर ती 'यमला पगला दीवाना २','यंगिस्तान','क्या सुपर कूल है हम','तुम बिन २','तान्हाजी' या सिनेमांमध्ये दिसली.
टॅग्स :नेहा शर्माबॉलिवूड