'काम हवं असेल तर माझ्याशी लग्न कर', निर्मात्याने अभिनेत्रीसमोर ठेवली अट; नकार दिल्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:29 IST
1 / 6मनोरंजनविश्वात अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन अनेक महिला दुरवरुन मुंबईत येतात. इथे स्ट्रगल करतात. बऱ्याच ऑडिशन देऊन त्यांना सुरुवातीला सतत रिजेक्शनला सामोरं जावं लागतं.2 / 6या इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार सर्रास घडतो. अनेक अभिनेत्रींना या प्रकाराला सामोरं जावं लागतं. त्यामुळे इथे काम मिळणं कठीण आहे हे लक्षात येतं.3 / 6टीव्ही आणि वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा कपूरने (Ayesha Kapoor) तिला आलेला असाच एक अनुभव मुलाखतीत सांगितला. आयशा 'शेरदिल शेरगिल' या टीव्ही शोमध्ये दिसली होती.4 / 6ती म्हणाली, 'मला आधीपासून अभिनेत्रीच बनायचं होतं. पण माझा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला लोक मला चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे. एकदा मला शोमध्ये लीड रोड ऑफर झाला होता. मात्र निर्मात्याने माझ्यासमोर एक अट ठेवली.'5 / 6'जर मी त्यांच्याशी लग्न केलं तर मला ही भूमिका मिळेल अशी ती अट होती. त्यांनी मला लक्झरी आयुष्य देण्याचं आमिषही दाखवलं. मात्र मी नकार दिला त्यामुळे त्यांनी मला शोमधून काढून टाकलं.'6 / 6आयशा 'लव्ह स्ट्रीट' या बॉलिवूड सिनेमातही दिसली. 'शेरदिल शेरगिल' शोमुळे तिला ओळख मिळाली. यात तिने 'निक्की'ची भूमिका साकारली होती.