बापरे! एवढा बदल? 'विवाह' सिनेमातली 'छोटी' आता दिसते अशी; कुठे गायब आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:02 IST
1 / 7अमृता राव आणि शाहिद कपूरच्या सुपरहिट सिनेमा 'विवाह'. सूरज बडजात्या यांच्या या सिनेमात अरेंज मॅरेजची सुंदर गोष्ट दाखवण्यात आली. 2 / 7या सिनेमाची एकेकाळी खूप क्रेझ होती. आजही सिनेमातील काही डायलॉग्सवरुन सोशल मीडियावर मीम्स बनतात.3 / 7सिनेमात अमृता रावच्या लहान बहिणीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री आठवतेय? सिनेमात तिला सगळे छोटी म्हणायचे. रजनी असं तिचं नाव होतं. 4 / 7ही अभिनेत्री आता ३८ वर्षांची आहे. तसंच तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. तिचं एकूणच ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.5 / 7या अभिनेत्रीचं नाव अमृता प्रकाश आहे. काही काळापासून ती सिनेसृष्टीमधून गायब आहे. 'टेक २ फिल्म्स' हे तिचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. मात्र आता ती पुन्हा वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. 6 / 7अमृता सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ९८ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 7 / 7तिचा ग्लॅमरस लूक पाहून ही 'विवाह' मधली छोटी आहे यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये. तिने पुन्हा सिनेमांमध्ये काम करावं याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.