Join us

दीप सिद्धूने प्रियसीसोबत साजरा केला होता व्हॅलेंटाइन डे; अपघाती मृत्यूनंतर फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 22:25 IST

1 / 5
पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जात असताना दीपच्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला.
2 / 5
पंजाबला येत असताना कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्या प्रकरणात दीपला काही महिने तुरुंगातही जावे लागले होते. सध्या तो जामीनावर बाहेर होता.
3 / 5
दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. २०१५मध्ये त्याचा पहिला सिनेमा 'रमता जोगी' रिलीज झाला. मात्र सिद्धूला २०१८ मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.
4 / 5
निधनाच्या काही तासांपूर्वी दीप सिद्धूनं गर्लफ्रेंड रीना रायसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. दीप सिद्धूच्या निधनानंतर रीनाला धक्का बसला आहे. पण रीना आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता.
5 / 5
रीना ही पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१४मध्ये तिने साउथ एशियाचा पुरस्कार जिंकला होता. तिने दीप सिद्धूसोबत ‘रंग पंजाब’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. दीप आणि रीना ही जोडी पंजाबमध्ये हिट ठरली होती.
टॅग्स :पंजाबबॉलिवूड