काल रात्री आराध्या आई ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर मुंबई विमानतळावर उतरली. विमानतळाबाहेर येताच तिला माध्यमांनी घेरले. काहीही न सांगता बºयाचशा कॅमेºयांमध्ये ऐश्वर्या आणि तिच्या मुलीचे फोटो काढले जात होते. मात्र ही बाब आराध्याला फारशी आवडली नसावी. कारण ती फोटो काढणाºयाकडे बघताना फारशी आनंदी दिसत नव्हती. फोटोमध्ये जर तुम्ही आराध्याच्या चेहºयाचे निरीक्षण केल्यास तुमच्या ही बाब लगेचच लक्षात येईल.
खरं तर पहिल्यांदाच आराध्या माध्यमांसमोर आली, असे अजिबात नाही. यापूर्वीदेखील तिने बºयाचदा पब्लिक एपीयरेंस केला आहे. त्यावेळी तिने मीडिया अटेंशनही एन्जॉयही केला आहे. मात्र यावेळेस आराध्या फारशा मूडमध्ये दिसत नव्हती. कदाचित रात्र अधिक झाल्याने तिला झोप लागत असावी. मुलीची स्थिती लक्षात घेऊन आई ऐश्वर्यानेदेखील लगेचच तेथून काढता पाय घेतला.