सैफची बहिण सोहा हिने सैफ ठिक असल्याचे सांगितले होते. सैफ ठिक आहे. त्याच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली होती. पण आता तो ठीक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, असे सोहा म्हणाली होती.
. सैफने अलीकडे ‘रंगून’चे शूटींग पूर्ण केले. आता तो अक्षत वर्मा दिग्दर्शित स्वत:च्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात बिझी आहे.
यापूर्वी विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यानही सैफच्या हाताला इजा झाली होती. त्यापूर्वी ‘एजंट विनोद’च्या एका अॅक्शन दृश्याच्या शूटींगदरम्यानही तो जखमी झाला होता.