कर्नाटकमध्ये असणारे हे एक शहर, ज्याला बेळगाव किंवा बेळगावी असे म्हणतात. वर्षभर तापमानात सातत्य असते. हिवाळ्यात ६ अंशापेक्षा कमी तापमान नसते. उन्हाळ्यात २६ ते ३२ अंश इतके तापमान असते. बेळगाव हे लहान, शांत शहर असून हिरवळही आहे. या ठिकाणी निसर्गरम्य स्थळे फारशी नसली तरी हातात हात घालून सहज फिरता यावं असे हे ठिकाण आहे.
मंदारमनी या गावाला फक्त १३ किलोमीटरचा रस्ता आहे. उर्वरित ठिकाणी हे गाव सर्वांपासून दूर राहते. पश्चिम बंगालमधील हे समुद्राकाठचे गाव असून, तुम्ही बीचवर गाडी चालवू शकता आणि चालूही शकता. अत्यंत शांत असे हे ठिकाण आहे.
पूर्वीची फ्रेंच वसाहत असणारे पुडूचेरी हे शहर. अत्यंत सुंदर बीचेस आणि खूप सारे कॉफी शॉप्स आहेत. एका किनाºयावर चालत तुम्ही निघू शकता. या ठिकाणी तुम्हाला अनेक रंग दिसतील.
माथेरान हे अत्यंत छोटे आणि अॅटोमोबाईल-फ्री हिल स्टेशन आहे. तुम्हाला कर्णकर्कश आवाज नको असेल तर या ठिकाणी जा. टॉय ट्रेनचा अनुभव घ्या, त्याशिवाय सुंदर अशा निसर्गसंपन्न गोष्टी पहा.
चंबा हे नैसर्गिक सुंदरतेसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. वर्षभर खूप छान वातावरण असते. त्याशिवाय तलाव, मंदिरे आणि स्थानिक बाजारपेठेतही तुम्ही चालत जात आनंद लुटू शकता.
मणिपूर आणि नागालँडच्या सीमेवर ही दरी आहे. मणिपूर माऊंटेनेअरींग अँड ट्रेकिंग असोसिएशनने पाच तासाचा ट्रेक करण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्याशिवाय या ठिकाणी सुंदर फुलेही पहावयास मिळतील.
मंगळुरमध्ये फारसे पाहण्यासारखे काही नसले तरी समुद्रकाठी तुम्ही अगदी निवांतपणे फिरु शकता. अरबी समुद्रकिनारी फिरताना, वाहणाºया नद्या आणि नारळाची झाडे तुम्हाला वेगळाच अनुभव देतील.
बंगालच्या खाडीजवळ यार्डा बीच आहे. या ठिकाणी कोणतेही दुकान तुम्हाला दिसणार नाही. काही अंतरावर रिसोर्ट आहेत. तुम्ही काहीही करु इच्छित नसाल तर अगदी शांतपणे या बीचवर तुम्ही फिरु शकता.