6181_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 15:27 IST
तुम्हाला बºयाच वेळा असं म्हटलं जाते की, तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहेत किंवा तुमचे नाक तुमच्या वडिलांसारखे आहेत. बºयाचशा अशा गोष्टी असतात, ज्या तुमच्या पालकांसारख्या असतात. परंतु काही वेळा त्यातील काही वेगळेपणही असते. ज्यावेळी पालकांचे केस काळे असताना आपले करड्या रंगाचे केस का?, तुमच्या पालकांचे डोळे निळे असताना आपले तशा पद्धतीचे का नाहीत? यामागील कारण का? काही विशिष्टता जन्मजातच असते. अशाच काही काही गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत.
6181_article
तुम्हाला बºयाच वेळा असं म्हटलं जाते की, तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहेत किंवा तुमचे नाक तुमच्या वडिलांसारखे आहेत. बºयाचशा अशा गोष्टी असतात, ज्या तुमच्या पालकांसारख्या असतात. परंतु काही वेळा त्यातील काही वेगळेपणही असते. ज्यावेळी पालकांचे केस काळे असताना आपले करड्या रंगाचे केस का?, तुमच्या पालकांचे डोळे निळे असताना आपले तशा पद्धतीचे का नाहीत? यामागील कारण का? काही विशिष्टता जन्मजातच असते. अशाच काही काही गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत.तुमची मुले लहान असताना त्यांना चष्मा लागतो. यासाठी टी. व्ही., व्हिडिओ गेम यांना तुम्ही दोष देऊ शकत नाही. यामागे तुमच्यातील जनुकांची महत्वाची भूमिका असते. संशोधनानंतर असे आढळले आहे की, कौटुंबिक इतिहासात लघुदृष्टीदोष लहानपणापासून निर्माण झालेला असतो. संशोधकांच्या अनुसार डोक्यावरील केस गळणे हे तुमच्यातील जनुकामुळे होते. याकरिता तुमच्या आईकडील जनुकाला दोष देऊ शकत नाही. तुमच्या आजोबा अथवा वडिलांना टक्कल पडलेला असेल तर तुम्हाला देखील तशाच गोष्टींचा सामना करावा लागतो. मेल पॅटर्न बाल्डनेस (एमबीपी) हा वयाच्या तिसाव्या वर्षापासून सुरु होतो आणि संपूर्ण टक्कल पडल्यानंतर तो थांबतो. नव्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांना असे वाटते की, जनुके जुगार खेळण्याला भाग पाडतात. तुम्ही जर कॅसिनोजमध्ये जाण्यापासून रोखू शकत नसाल तर हा जनुकाचा दोष आहे, असे समजा. शास्त्रज्ञांच्या अनुसार यासाठी गुणसुत्रे दोषी आहेत. ह्युस्टन येथील एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटर मधील प्राध्यापक ख्रिस्तोफर अमॉस यांच्या अनुसार जनुके ही धुम्रपान करण्यास भाग पडतात आणि त्यातून लवकर बाहेर पडता येत नाही. तुमची चयापचय क्रिया ही जनुकाच्या विशिष्टतेवर अवलंबून आहे. पथ्य पाळूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर हा तुमच्या जनुकाचा दोष आहे. जरी राग येणे हा मानवी स्वभाव असला तरी तुमच्या जनुकावर अवलंबून असते की हा राग इतका का येतो? जनुकाच्या रचनेमुळे तुम्हाला अधिक राग येतो.