श्रीले अब्राहम आणि अमित मधेशियाचा ‘द सिनेमा ट्रॅव्हलर्स’ हा चित्रपट केन्ससाठी यावर्षी जाणार आहे. ग्रामीण महाराष्टÑातील गायब होत असलेल्या टुरिंग टॉकीजविषयी हा चित्रपट आहे. ९६ मिनिटांचा हा चित्रपट तयार करण्यासाठी आठ वर्षे लागली. इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्टस्ने याला मदत केली आहे.
आदित्य विक्रम सेनगुप्ताचा मेमरीज अँड माय मदर हा केन्स फिल्म फेस्टीव्हलसाठी जाणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना सेनगुप्ता म्हणाला, मी ज्या शहरात वाढलो, त्या कोलकाता शहराविषयी हा चित्रपट आहे.
यापूर्वी आपण अनुराग कश्यपचा रामन राघव २.० ट्रेलर पाहिला. हा चित्रपट १९६० चा सिरीअल किलर रामन राघव याच नावाने प्रदर्शित झाला. नवाजुद्दीन सिद्दीकी हा रामन राघवची भूमिका साकारत आहे. कश्यप आणि सिद्दीकी दोघेही काय कमाल करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
कोलकात्याच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी सौरव राय याने ही २८ मिनिटांची नेपाळी भाषेतील फिल्म गुढ (जाळे) तयार केली आहे. २३०० एन्ट्रीजमधून निवडण्यात आलेल्या १८ फिल्म्समध्ये याचा समावेश आहे.
केन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये बाहुबली दाखविण्यात येणार असल्याचे नुकतेच सांगण्यात आले. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी याची पूर्ण तयारी केली आहे. या चित्रपटाने मार्केटमध्ये अगोदरच धूम गाजविली आहे.
कबीर बेदी यांनी लिहिलेली ही डॉक्युमेंटरी केन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखविण्यात येणार आहे. मैत्रेय बुद्ध वंशावळीवर आधारित चित्रपटाचे शिवाजी चंद्रभूषण दिग्दर्शन करीत आहेत.