ग्रीसमध्ये असलेला अर्काडिको हा जगातील सर्वात जुना वापरात असलेला पूल आहे. ग्रीक साम्राज्यात म्हणजे १३००-१२०० इ. स. पूर्वी बांधण्यात आला आहे. टायरन्स आणि इपिडॉरस या दोन शहरांना जोडणारा आणि सैनिकांसाठी हा पूल बांधण्यात आला. साध्या पुलापेक्षा थोडा मोठा हा पूल आहे. म्हणजे २.५ मीटर (८ फूट). दगडांना एकमेकांशी घट्ट बांधणारे काहीही नाही.
एक्समूर येथे हा पूला आहे. हा खाचखळग्याप्रमाणे वाटणारा पूल आहे. इ. स. पूर्व ३००० साली हा बांधण्यात आला असावा असा अंदाज आहे. टुडोर काळात अशा प्रकारच्या पुलांची निर्मिती होत असे. म्हणजे किमान १५०० वर्षांपूर्वीचा असावा असेही सांगितले जाते. राक्षसाने स्वत:च हा पूल बांधला असावा असेही बोलले जाते.
इ. स. १३६ व्या वर्षी राजा हॅड्रीयनने हा पूल बांधला. पाँटे सँट अँजेलो हा रोममधील विख्यात आणि सुंदर पूल आहे. संपूर्ण रोम शहराला जोडणारा हा पूल आहे. १६६८ साली या पुलाला १० खांब जोडण्यात आले. प्रत्येक खांबावर येशूख्रिस्ताला सुळावर चढवित असल्याचे चिन्ह आहे.
याला झाओझु पूल असेही म्हणतात. चीनमधील सर्वात जुना पूला आहे. साधारणत: इ. स. ६०५ साली हा बांधण्यात आला असावा. याला ‘सुरक्षित पार करणारा पूल’ असेही म्हटले जाते. हा पूल बांधणारा अभियंता जगातील सर्वोत्कृष्ट अभियंत्यापैकी एक आहे. या पुलाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अमेरिकन सोसायटी आॅफ सिव्हील इंजिनिअरनेही याचे कौतुक केले आहे.
याला सेव्हरन पूल असेही म्हटल जाते. टर्कीमध्ये दुसºया शतकात हा पूल बांधला असवा. रोमन सम्राट सेप्टीमिअर सिव्हेरिअस, पत्नी, दोन मुले कॅरकेला आणि गेटा यांनी याबाबत अभिप्राय दिला आहे. रोमन राजांनी बांधलेला दुसरा सर्वात मोठा पूल असेही याला म्हटले आहे. याच्या प्रत्येक बाजूला दोन खांब असून, ते राजघराण्याचे प्रतिक आहेत.
१७ व्या शतकात हा पूल बांधण्यात आला. दोन पर्वतांच्यामध्ये २०० मीटर खोलवर हा पूल बांधण्यात आला आहे. जबल अलअमीर आणि जबल अल फैश या पर्वतादरम्यान हा पूल आहे. सारखा चढउतार करावा लागत असल्याने नागरिक वैतागले होते. त्यानंतर हा पूल बांधण्यात आला. एकेकाळी हा पूल तोडावा असे साºयांना वाटत होते, आता हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.