कमरेचा घेर कमी करण्यासाठी दररोजच्या आहारात एक कप मसूरची आवश्यकता आहे. तुमच्या चयापचय क्रियेसाठी शरीरात लोहाची कमतरता असणे योग्य नव्हे. कारण कॅलरीज अधिक प्रमाणात जळत असतील तर शरीर फारसे काम करु शकत नाही.
अनेक संशोधकांच्या अनुसार समाधानकारक कॅल्शियमची मात्रा तुमच्या शरीरातील मेदाचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते.
तुम्ही जर योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास तुमच्या चयापचय क्रियेचा वेग वाढतो. कॅफिनमुळे तुम्हाला फारसा थकवा येत नाही आणि व्यायामादरम्यान तुमची सहनशक्ती कायम राहते.
हिरवा चहा घेतल्यास काही तासातच तुमचा चयापचय क्रियेचा वेग वाढतो. संशोधकांच्या अनुसार रोज दोन ते तीन कप हिरवा चहा पिल्यास तुमच्या शरीरातील १७ टक्के अधिक कॅलरीज अधिक जाळते.
कडधान्यामुळे तुमच्या शरीरातील अधिक प्रमाणात असलेले मेद जाळण्यासाठी उपयोगी पडतात. तुम्ही जर करडा भात खाल्ला तर त्यामध्ये अधिक उच्च प्रमाणात तंतू असतात.
तुमच्या शरीराला पाण्याची अधिक गरज असते. तुम्हाला जराशी जरी तहान लागण्यास सुरुवात झाली तर तुमच्या चयापचयाची क्रिया मंदावते. एका संशोधनानुसार आठ किंवा अधिक ग्लास पाणी पिल्यास तुमच्या शरीरातील कॅलरीज अधिक प्रमाणात जळतात.
मिरच्या या नैसर्गिक रसायन आहे, ज्यायोगे तुमच्या चयापचय क्रियेत लगेचच वाढ होते. कोणत्याही पदार्थात चमचाभर मिरची टाकली तरी तुमचा चयापचय दर वाढतो.