म्हातारपणात काका-काकूंनी करावयाचा प्रकार म्हणून योगाकडे आपण पाहतो. पाश्चिमात्य देशात योगा हा प्रमुख ‘ट्रेंड’ बनलाय. त्यांनी योगामध्ये अनेक नवनवीन ‘कुल’ स्टाईल्स आत्मसात केल्या आहेत. उदाहरणार्थ डोगा (कुत्र्यासोबत), घोडयोगा (घोड्यासोबत), काराओके योगा काही तर नग्न योगाही करतात. अर्थात हा योगा आपण नक्कीच पाहणार नाही.
प्रत्येक भारतीयाच्या घरी हळद आढळते. आपल्या अन्नामध्ये किंवा विविध प्रकारात हळद वापरतात. काही जण दररोज तर दुधात हळद घालून ती पितात. यामध्ये अनेक जंतुरोधक गुण आहेत. सध्या पाश्चिमात्य देशात हळद लोकप्रिय झाली आहे. आपल्या रोजच्या आहारात हळद वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
उत्तर भारतात नारळाचे तेल फारसे वापरत नसले तरी दक्षिणेमध्ये सगळीकडे नारळाचे तेलच वापरतात. पाश्चिमात्यांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सुरुवातीला आरोग्याला चांगले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात हे चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. स्वयंपाकात याचा वापर वाढला आहे.
प्रत्येक घरात किमान एक तरी व्यक्ती सकाळी आल्याचा चहा पिताना आपल्याला दिसतो. ब्रिटींशांमुळेच आपल्याकडे चहा आला. (अर्थात याची सुरुवात चीनमध्ये झाली). कित्येक जण चहाविना राहूच शकत नाहीत. आल्याचा चहा हा पाश्चिमात्यातही लोकप्रिय आहे. थंडी आणि सर्दीमध्ये चहा हुडहुडी घालवितो.
डालडा हा सुरुवातीला अपायकारक असल्याचे सांगण्यात येत होते. नव्या संशोधनानुसार हा आरोग्याला लाभयदायक असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या खाद्यपदार्थात याचा वापर होतो आहे. नारळाच्या तेलाप्रमाणे जरी लोकप्रिय नसले तरी याचा ट्रेंड वाढतोय.
हजारो वर्षांपासून भारतामध्ये ध्यानसाधना केली जाते. वेदामध्ये याचा उल्लेख आहे. जगभरातील लोक आता ध्यानाचे तंत्र शिकले असून, ओम मंत्र उच्चारणे आणि श्वास रोखून धरणे असा व्यायाम केला जातो.