तुम्ही जर तुमच्या वजनाबाबत साशंक असाल तर तुम्ही पित असलेले दूर मलईविरहित असेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. किमान १ टक्के तरी मलई कमी करणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक ग्लासामागे तुम्ही १५ कॅलरीजची बचत करु शकता.
सकाळी नाष्ट्यावेळी वापरण्यात येणारा ब्रेड अथवा टोस्ट, तसेच दुपारच्या जेवणावेळी सँडविचमध्ये वापरले जाणारे ब्रेड कमी करा आणि प्रति स्लाईस २० कॅलरीजची बचत करा.
नाष्टा करताना वापरले जाणारे पदार्थ कदाचित उपयोगी आणि चविष्ट वाटत असतील, मात्र काहीमध्ये साखर आणि काही कॅलरीजचा समावेश असतो. तुम्ही अगदी सकाळी याचा वापर केला त्याशिवाय ताजी बेरीज, अर्धे केळ आणि काही बदाम खाल्ले तर तुमच्या जेवणापर्यंत तुम्ही संतुलित राहू शकता.
दह्याचा वापर सकाळी कमी केल्यास सुमारे ५४ कॅलरीजची बचत होते. हे प्रत्येकजण करु शकतात. त्याशिवाय तुमच्या चवीमध्येही फारसा फरक पडत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला लोणी आवडत असेल तर त्यावर आवर घालणे आवश्यक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मेद असतो. तुम्ही जर लोण्याचा वापर कमी केल्यास ७ टक्के बचत होते.
तुम्हाला पालेभाज्या आवडत असतील अथवा नसतील तुम्हाला त्यातील किमान ५ टक्के भाग आवश्यक असतो. त्यामुळे तुकडे केलेले बटाटे अथवा कोबी तुम्ही टाळला पाहिजे.
रोजच्या जीवनात आवश्यक असले तरी पाणी पिणे काहींना बेचव वाटत असते. साखरयुक्त पेये पिवून स्वत:चे वजन वाढवून घेण्यापेक्षा पाणी पिणे केव्हाही चांगले. यामुळे कॅलरीजची बचत होते.