शिल्पा शेट्टीचे सध्याचे वय ४० वर्ष इतके आहे. मात्र तिच्या फिगरकडे बघुन कोणालाही तिचे खरे वय सांगता येणार नाही. शिल्पाला एक मुलगा आहे.
माजी विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्या रॉय-बच्चनचे वय ४२ वर्ष इतके आहे. मात्र आजही तिच्या सौदर्यापुढे नव्या दमाच्या अभिनेत्री अपयशी ठरतात. ऐश्वर्याला एक मुलगी असून, सध्याच्या स्थितीत बॉलीवुडमधील ती सुपर मॉम ठरत आहे.
बालीवुडची नंबर वन अॅक्ट्रेस राहिलेली काजोल दोन मुलांची आई आहे. मुलांचा सांभाळ करून ती तिच्या करिअरकडे लक्ष देते.
दोन मुलांची आई असलेल्या मलाइका अरोरा-खानच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे. मलाइका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याने तिचे सौदर्य आजही प्रेक्षकांना घायाळ करते.
४१ वर्ष वय असलेल्या करिश्मा कपूरला दोन मुले आहेत. शिवाय तिचे कौटूबिंक जीवनही बरेचसे वादग्रस्त ठरले आहे. मात्र यासर्व बाबींचा तिच्या फिगरवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
बॉलीवुडची धकधक गर्ल म्हणून ओळख असलेल्या माधुरी दीक्षितचे वय ४८ वर्ष इतके आहे. मात्र आजही ती बॉलीवुडमध्ये तिच्या सौदर्याचे जलवे दाखवित आहे. मुलांचा सांभाळ करून ती बॉलीवुडमध्ये सक्रीय आहे.
४२ वर्षाची ट्विंकल खन्नाला दोन मुले आहेत. मात्र आजही तिचे सौदर्य वाखण्याजोगे आहे. तिच्याकडे बघुन तिच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे.
४८ वर्ष वय असलेल्या जूही चावलाचे सौदर्य आजही अबाधित आहे. तिची स्माइल आजही पहिल्यासारखीच क्युट आहे.
४१ वर्षाची अभिनेत्री रवीना टंडन दोन मुलांची मॉम आहे. तिचे सौदर्य आजही अनेकांना घायाळ करते.