आपणास ताजमहल माहिती आहेत. अगदी तसेच. एका मुलीने आपल्या वडिलांना दिलेली ही श्रद्धांजली आहे. नूरजहानने आपले वडील मिर गयास बेग यांच्या स्मरणार्थ हे स्मृतीस्थळ १६२२-१६२८ या काळात बांधले. हे बगीच्यामध्ये असलेल्या दागिन्याच्या पेटीप्रमाणे आहे. यात लाल आणि पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. ताज महलसाठीचे हे खरे प्रेरणास्थान मानले जाते. नूरजहान यांचा मुलगा शाहजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहल ही अद्वितीय इमारत बांधली.
१५६५ ते ७२ या काळात हमीदा बेगम उर्फ हाजी बेगम यांनी ही इमारत बांधली. भारतीय आणि पर्शियन संस्कृतीचा हा अजोड नमुना आहे. सिकंदर लोधीची कबर भारतामधील बागेतील पहिले स्मृतीस्थळ आहे. या ठिकाणी मोघल साम्राज्यातील अनेकांना दफन करण्यात आले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बहादूरशाह जफर आणि त्यांच्या तीन राजकुमारांना याच ठिकाणी दफन करण्यात आले आहे.
सोळंकी साम्राज्यातील उदयामती राणीने आपला पती राजा भीमदेव (पहिला) यांच्या स्मरणार्थ १०६३ साली हे मंदिर बांधले. पायºयांची विहीर असेही याला म्हणता येईल. सरस्वती नदीला आलेल्या पुराने याचे बरेचसे अवशेष वाहून गेले. त्यानंतर त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. अनेक चित्रपटाचे शुुटींग या ठिकाणी झाले आहे. २०१४ साली युनेस्कोने याला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
हंपी येथील विख्यात विरुपाक्ष मंदिर विख्यात आहेच. त्याचप्रमाणे इ. स. ७४० साली लोकमहादेवी यांनी पट्टडकल येथे हे मंदिर बांधले. द्रविडीयन शैलीतील हे पहिले पूर्ण मंदिर आहे. विक्रमादित्य दुसरा या आपल्या पतीच्या स्मरणार्थ राणीने हे मंदिर बांधले. यामध्ये ३२ पवित्र जागा होता. कालौघात त्या नष्ट झाल्या.
गिरसप्पा येथील राणी चेन्नभैरादेवी ज्यांना रैेना डी पेमेंटा असेही म्हटले जाते, त्यांनी हा किल्ला बांधल्याचे सांगण्यात येते. या भागात मसाल्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायचा. पोर्तुगीजांच्या काळात या किल्ल्याचा वापर झाला.
जौनपूरच्या बीबी राजे किंवा राजे बिबी यांनी संत सय्यद अली दाऊद कुतुबुद्दीन यांच्यासाठी लाल दरवाजा मस्जीद बांधली. सुलतान महमूद शिराकीच्या त्या राणी होत्या. १४४७ साली ही बांधण्यात आले.