3839_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:17 IST
श्रीमंत देशातील मुले कोट्यवधी रुपयांचे चॉकलेटस्चे बॉक्स, मोबाईल फोन खरेदी करतात. त्याचवेळी गरीब देशातील अनेक बालके कुपोषणाने मरत असतात. या जगात अत्यंत महागड्या आणि निरुपयोगी गोष्टी कोणत्या आहेत, त्याची माहिती या ठिकाणी देत आहोत.
3839_article
श्रीमंत देशातील मुले कोट्यवधी रुपयांचे चॉकलेटस्चे बॉक्स, मोबाईल फोन खरेदी करतात. त्याचवेळी गरीब देशातील अनेक बालके कुपोषणाने मरत असतात. या जगात अत्यंत महागड्या आणि निरुपयोगी गोष्टी कोणत्या आहेत, त्याची माहिती या ठिकाणी देत आहोत.ली चॉकलेटच्या मिठाईचे बॉक्स अत्यंत महागडे आहेत. जगभरातील निवडलेल्या प्रमुख चॉकलेटस्चा यात समावेश आहे. नैसर्गिक पिवळ्या आणि निळ्या रंगाचा महागड्या दागिन्यांचाही सेट आहे. याची किंमत सुमारे एक ते दीड लाख डॉलर इतकी आहे. प्लॅटीनम आणि सोन्यापासून पीटर अलॉयसन यांनी तयार केलेले डायमंड क्रिप्टो हे स्मार्ट फोन सुमारे ८० हिºयांनी सजविलेले आहेत. फोनच्या दोन्ही बाजूंनी ५० हिरे आहेत. याच्या नेव्हीगेशन बटनला २८ हिरे जोडलेले आहेत. या फोनची किंमत दीड कोटी डॉलर इतकी आहे. जपानमधील कार्टुन चित्रपट हॅलो किटीसारखे असणे कोणाला आवडणार नाही? हे प्लॅटीनमचे मांजर असून, त्याची रुंदी ३.८ से. मी., उंची ५.६ से. मी. इतकी आणि वजन ५९० ग्रॅम इतके आहे. यामध्ये हिरे, रुबी, माणिक यांचा समावेश आहे. याची किंमत १ लाख ६३ हजार डॉलर इतकी आहे. न्यूयॉर्कमधील पिझेरिया आॅफ निनो येथील बेलिस्मिया पिझा हा जगातील सर्वात महागडा पिझ्झा म्हणून ओळखला जातो. क्रीम फिश, चिव्ह ओनियन, चार वेगळ्या प्रकारचे पेट्रोशियन कॅव्हिअर, अत्यंत लहानसा स्लाईस याचा या पिझ्झामध्ये समावेश आहे. हा पिझ्झा ८ लोकांसाठी आहे. याची एका स्लाईसची किंमत १२५ डॉलर इतकी आहे. १४ जून २००७ साली गिंझा टनाका कंपनीने प्लॅटीनमची हँडबॉग टोकियोच्या फॅशन शोमध्ये आणली. शुद्ध प्लॅटीनमपासून तयार केलेल्या या हँडबॅगेत २,१८२ हिरे असलेल्या २०८ कॅरटचा समावेश होता. याची किंमत १६ लाख ३० हजार डॉलर इतकी होती.