मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्या रॉयचे नावही बºयाचशा सेलिबेटींशी जोडले गेले. करियरच्या अगदी सुरुवातीलाच ती राजीव मूलचंदानी यांच्या प्रेमात पडली होती. पुढे त्यांच्या अफेयरच्या जोरदार चर्चा करण्यात आल्या. मात्र त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव सलमान खान, विवेक ओबेरॉय याच्याशी जोडले गेले. त्यानंतर तिचे अभिषेक बच्चन याच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे.
क्रिकेटर विराट कोहली याच्या प्रेमाचा खुलेपणाने स्विकार करणाºया अनुष्का शर्माने त्याच्याशी नाते जवळपास तोडले आहे. मैदानातूनच अनुष्काला फ्लार्इंग किस देणाºया विराटला आता तिचे नावही पसंत नाही. पत्रकारांनी त्याला अनुष्काबाबत विचारले असता, त्याचा चांगलीच संताप झाला होता. मात्र अनुष्काचे विराट पहिलेच प्रेम होते, असे अजिबात नाही. जेव्हा ती मॉडलींग करीत होती, तेव्हा तिचे नाव जोहेब यूसुफ याच्यासोबत जोडले गेले. मात्र अभिनेत्री म्हणून सक्सेस मिळाल्यानंतर अनुष्का आणि जोहेबमध्ये ब्रेकअप झाले.
दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हा हिची बॉलीवुडमध्ये एंट्री होण्याअगोदर तिचे फेम सिनेमाचे मॅनेजिंग डायरेक्टर आदित्य श्रॉफ यांच्याशी प्रेमप्रकरण होते. मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नाही. दोघांमध्ये ब्रेकअप झाले.
बॉलीवुडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोणचे आतापर्यंत बºयाचशा सेलिब्रेटींशी नाव जोडले गेले. सध्या ती अभिनेता रनवीर सिंहला डेट करीत आहे. मात्र बॉलीवुडमध्ये एंट्री करण्याअगोदर जेव्हा दीपिका मॉडलिंग करीत होती, तेव्हा तिचे नाव निहार पांड्या याच्याशी चर्चिले जात होते. दोघांच्या प्रेमांची त्यावेळेस भरपुर चर्चाही रंगली होती. दोघेही ‘लिव-इन रिलेशनशिप’मध्ये होते. पुढे दीपिकाने बॉलीवुडमध्ये एंट्री केल्यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाले.
बॉलीवुडची देशी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियंका चोपडा सध्या सिंगल जीवन जगत असली तरी सुरुवातीच्या काळात तिचे अनेक सेलिबेटींबरोबर ना जोडले गेले. बॉलीवुडबरोबरच हॉलीवुडमध्ये वेगळी छाप पाडणाºया प्रियंकाचे मॉडलिंगच्या काळात असीम मर्चेंट याच्याशी नाव जोडले गेले होते. २००० सालात मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिचे असीमबरोबर ब्रेकअप झाले
अभिनेता अर्जुन कपूर सलमान खानची लहान बहिण अर्पिता खान हिला डेट करीत होता. दोघेही जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र पुढे त्यांचा ब्रेकअप झाला. अर्पिताशी रिलेशनशिपमध्ये असताना अजुर्न खुप जाडा होता. मात्र इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर त्याने अर्पिताशी असलेले संबंध तोडले.
श्रीलंकन सुंदरी जॅकलीन फर्नांडिस हिचे बॉलीवुडमध्ये एंट्री करण्याअगोदर प्रिंस हसन बिन राशिद अल खलीफा याच्याशी प्रेमप्रकरण होते. दोघेही लग्न करणार अशी जोरदार चर्चाही होती. मात्र बॉलीवुडमध्ये एंट्री केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
बॉलीवुडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेल्या रणबीर कपूर याचे कित्येक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. रणबीरचे सर्वात अगोदर अभिनेता इमरान खान याची पत्नी अवंतिका हिच्याशी प्रेमप्रकरण होते. दोघेही जवळपास पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.