आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. पुढे सिद्धांत ‘शूट आउट अॅट वडाला’ या चित्रपटात बघावयास मिळाला. चित्रपट बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यात यशस्वी ठरला. मात्र सिद्धांतला करिअर स्थिर करता आले नाही. आजही सिद्धांत बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करीत आहे.
सोनाक्षी आणि तिचा भाऊ लव सिन्हा यांनी २०१० मध्ये एकत्रच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. एकीकडे सोनाक्षीचा ‘दबंग’ हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला तर दुसरीकडे लवचा ‘सदिया’ हा चित्रपट सपाटून पडला. सोनाक्षीची तुलना आज बॉलिवूडमधील टॉप अॅक्ट्रेसेसमध्ये केली जाते. तर लव सध्या चित्रपटांपासून चार हात लांबच आहे.
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमीर खानला त्याचा भाऊ फैजल खान याचे करिअर सेट करण्यात मात्र सपशेल अपयश आले. ‘मेला’ (२०००) आणि ‘चिनार दास्ताने इश्क’ (२०१५) यासारख्या चित्रपटात काम केलेल्या फैजलला मोठे यश मिळालेच नाही. पुढे त्याने दोनवेळा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. आमीर मात्र कायम यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान राहिला.
दोन दशकाहून सैफ अली खान बालिवूडमध्ये अॅक्टिव आहे; मात्र त्याची लहान बहीण सोहा स्वत:ची ओळख निर्माण करण्यास फारसी यशस्वी ठरली नाही. ‘रंग दे बसंती’ यासारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटात संधी मिळूनदेखील तिला याचा लाभ घेता आला नाही. कुणाल खेमू याच्याशी लग्न केल्यानंतर सोहा बॉलिवूडमधून गायबच झाली आहे.
या दोन भावंडांनी मात्र आपली वेगळी ओळख बनविण्यात यश मिळवले. धर्मेंद्रची मुले असल्याचा त्यांना लाभ झाला खरा पण, त्यावाचून काही अडणार नाही याची काळजी या दोघांनीही घेतली. तुलनात्मकदृष्टीने विचार केला सनी देओल बॉबीपेक्षा जास्त यशस्वी राहिला. पण, म्हणून बॉबीच्या यशाला कमी लेखता येणार नाही.
http://www.cnxdigital.com/assets/images/footer-icon.jpg