ग्रेस आणि स्टाईलमध्ये रितू बेरी हे नाव गाजलेले आहे. पॅरीसमध्ये त्यांनी पहिल्यांदा केलेल्या प्रदर्शनामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. 1990 साली ‘लावण्या’ या नावाखाली त्यांनी सुरुवात केली. एफआयटी, दिल्लीमधून त्यांनी फॅशन डिग्री संपादन केली. देशातील आघाडीच्या व सेलिब्रेटी डिझायनर्समध्ये रितू बेरी हिचा समावेश होतो.
हस्तकलेत माहीर असणारे भारतामधील विख्यात डिझायनर रोहित बल शहरी भागात युवकांचे आयकॉन्स आहेत. भारतामधील पारंपरिक कलेला त्यांनी पुढे आणले. पामेला अँडरसन, नाओमी कॅम्पबेल, सिंडी क्रॉफोर्ड आणि अॅना कुर्निकोव्हा हे त्यांचे क्लायंटस् आहेत. जाहिरातींमध्ये देखील मॉडेलिंग करताना तुम्ही रोहितला पाहू शकता.
1980 च्या दशकापासून रिना ढाका या प्रसिद्ध आहेत. ‘युवा रतन अॅवॉर्ड’ने त्यांना गौरविण्यात आले आहे. पाश्चिमात्य डिझाईन्समध्ये त्या पारंगत आहेत. त्यांना फ्युजन करायला देखील आवडते. त्यांचे पॅरीस, लंडन, न्यूयॉर्क आणि दुबईमध्ये त्यांनी आपली विविध प्रदर्शने लावली आहेत.
जे जे वाल्या हे भारतामधील सर्वात विख्यात फॅशन डिझायनर्सपैकी आहेत. हाऊस आॅफ वाल्याची निर्मिती त्यांनी केली. आपले बंधू टीजे सिंग यांच्यासह 1992 साली लाईफस्टाईल हाऊस सुरू केले. फॅशन डिझायनिंग कौन्सिल आॅफ इंडियाचे ते संस्थापक सदस्य आहेत. जेजे वाल्या यांचे नाव डिझायनिंग क्षेत्रात आदराने घेतले जाते.
कोलकाता येथे जन्मलेले सब्यसाची हे 1999 पासून या क्षेत्रात आहेत. सब्यसाची या नावाने आपले उत्पादन विक्री करतात. फॅशन डिझाईन कौन्सिल आॅफ इंडियाचे ते सदस्य आहेत. नॅशनल म्युझियम आॅफ इंडियन सिनेमाचे ते सर्वात तरुण सदस्य आहेत. वधूंचे कपडे आणि इथिनिक डिझाईन्ससाठी ते प्रसिद्ध आहेत. डिझायनर साडी या क्षेत्रात साब्यासाची हे नाव ब्रॅण्ड झाले आहे.
हे दोघे नावाजलेले फॅशन डिझायनर्स आहेत. युरोपियन पद्धतीनुसार भारतीय हस्तकला आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला नवे आयाम मिळवून देण्यात त्यांचा वाटा आहे. पारंपरिक आणि नव्या पद्धतीने डिझाईन्स करतात. हार्डोस येथे प्रदर्शन करणारे ते पहिले भारतीय डिझायनर्स आहेत. त्यांच्या डिझाईन्समध्ये नाविन्याचा शोध घेणे फारच सोपे आहे.
रितू कुमार या देशातील बेस्ट फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. समकालिन तसेच पारंपरिक पद्धतीने कापडांना नवे डिझाईन करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. भारतात झालेल्या मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी त्यांनी कॉश्चुम डिझायनिंग केले. अनेक मोठ्या सेलिब्रेटींचे लाडके डिझायनर असल्याचा मान रितूला मिळतो.
भारताच्या पश्चिमेला गोव्यामध्ये वेंडेल रॉड्रीक्स हे विख्यात फॅशन डिझायनर म्हणून ओळखले जातात. फॅशनमधील वाईड रेंज डिझाईन करण्यात वेेंडेलेचा हातखंडा आहे. वर्ल्ड कॉश्चुम हिस्ट्रीपासून ते फॅशन जर्नलिझम आणि इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग कॅम्पेनसंदर्भात मार्गदर्शनाचे कामही तो करतो. 2014 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारतामधील मोठ्या फॅशन डिझायनर्सपैकी एक आहेत. पत्नी सैलजा ‘सल’ ताहिलयानी यांच्यासोबत 1987 साली त्यांने भारतामधील पहिले मल्टीडिझायनर बुटीक सुरू केले. 1990 साली ताहिलयानी स्टुडिओची सुरुवात केली. तरुण न्यूयॉर्कच्या फॅशन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा माजी विद्यार्थी आहे.
भारतामधील विख्यात फॅशन डिझायनर. बेस्ट फॅशन डिझायनर्स आॅफ इंडिया 2015 चा पहिल्या क्रमांकाचा ड्रेस डिझायनर म्हणून त्याची निवड. बॉलिवूडचेही ते सर्वात आवडते आहेत. त्यांचे स्वत:चे ‘रिव्हीरी’ नावाचे स्टोअर आहे. देशभरातील टॉप सेलिब्रिटी आणि मोठ्या कुटुंबाचे ड्रेस डिझाईनची जबाबदारी मनीषवर असते.