Join us

"लग्नावरचा माझा विश्वास उडालाय!"; ३८ वर्षीय अभिनेत्रीने सिंगल राहण्यामागचं सांगितलं कारण

By देवेंद्र जाधव | Updated: May 14, 2025 13:23 IST

1 / 7
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ३८ व्या वर्षीही सिंगल आहे. या अभिनेत्रीचा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडालाय. त्यामुळे तिला लग्नच करायचं नाहीय. कोण आहे ती?
2 / 7
या अभिनेत्रीचं नाव आहे झरीन खान. अभिनेत्री आज १४ मे रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. झरीन खान अजूनही सिंगल का आहे, यामागचं कारण तिने सांगितलं आहे
3 / 7
सध्या झरीन खान कोणत्याही सिनेमात काम करत नसली तरीही ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. झरीन खानने अजून लग्न केलं नाही.
4 / 7
लग्नाचा विषय काढल्यावर झरीन म्हणते, आजकाल लोक प्रेशरमध्ये येऊन लग्न करतात. त्यानंतर काही महिन्यांनंतर किंवा काही वर्षांनंतर हे लोक वेगळे होतात.
5 / 7
मी लग्न करायच्या शर्यतीत नाही. सध्या सर्वच अभिनेत्री लग्न करत आहेत. यामागे कोणाचं प्रेशर असतं की खरंच प्रेम असतं? माहित नाही. अशा शब्दात झरीनने तिचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगितलं आहे.
6 / 7
एकूणच झरीनचा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाला आहे, असं तिचं म्हणणं आहे. झरीनने सलमान खानसोबत वीर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
7 / 7
वीर सिनेमानंतर झरीन आपल्याला हाऊसफुल्ल २, वजह तुम हो या सिनेमांमध्ये दिसली होती. झरीनकडे सध्या कोणताही बॉलिवूड प्रोजेक्ट नाही
टॅग्स :जरीन खानलग्नसलमान खान