Join us

10218_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 15:11 IST

रिओ आॅलिम्पिक्सना प्रारंभ झाला आहे. खेळ आणि बॉलीवूड यांचे जवळचे नाते आहे. खेळ हा विषय घेऊन अनेक बॉलीवूड चित्रपट तयार झाले आहेत. नुकताच बुधिया: बॉर्न टू रन आॅर नॉट हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशाच काही चित्रपटांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

रिओ आॅलिम्पिक्सना प्रारंभ झाला आहे. खेळ आणि बॉलीवूड यांचे जवळचे नाते आहे. खेळ हा विषय घेऊन अनेक बॉलीवूड चित्रपट तयार झाले आहेत. नुकताच बुधिया: बॉर्न टू रन आॅर नॉट हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशाच काही चित्रपटांची माहिती या ठिकाणी देत आहोत.मुलींच्या हॉकी टीमवर आधारित हा चित्रपट खूप गाजला. २००७ साली शिमीत अमीन यांनी दिग्दर्शित केलेला आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला होता. शाहरुख खानने या चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.मन्सूर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आमिर खान, आयेशा जुल्का, मामिक सिंग, दीपक तिजोरी यांच्या प्रमुख भूमिका होता. सायकलिंग या खेळावर आधारित हा चित्रपट होता.फुटबॉल या खेळावर आधारित हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला होता. रॉनी स्क्रूवाला याचे निर्माते होते. जॉन अब्राहम, बिपाशा बासू, अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.फ्लार्इंग सिख मिल्खा सिंग यांच्यावर आधारित हा चित्रपट अ‍ॅथलेटिक्सवर आधारित आहे. फरहान अख्तरने यात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी याचे दिग्दर्शन केले होते.अ‍ॅथलिट पानसिंग तोमर यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. भारतीय सेनादलात असणाºया आणि राष्टÑीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाºया पानसिंग तोमर यांची ही कथा आहे. इरफान खान याची प्रमुख भूमिका आहे.बेंड इट लाईक बेकहॅम हा चित्रपट इंग्लंडमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात परमिंदर नागरा, किएरा नाईटली, जोनाथन मेअर्स, शाझनी लेविस आणि आर्चि पंजाबी यांच्या मुख्य भूमिका आहेत.आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान या चित्रपटाने क्रिकेट खेळाच्या माध्यमातून जुलमी कर कसा कमी केला गेला याचे चित्रण केले. आमिर खान, ग्रेसी सिंग, रशेल शेली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.टोनी डिसुझा दिग्दर्शित आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझहरुद्दीनपासून प्रेरित अजहर हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. इम्रान हाश्मी, नर्गिस फाखरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.देव आनंद दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान, आदित्य पांचोली यांच्या मुख्य भूमिका होत्या. सनी आणि रॉनी या दोन खेळाडूंमधील वितुष्ट यात दाखविण्यात आले आहे.नागेश कुकनूर दिग्दर्शित इकबाल या चित्रपटात श्रेयस तळपदे याची प्रमुख भूमिका आहे.