सागरिका घाटगे
सागरिका घाटगे हिने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात प्रीती सभरवालची भूमिका साकारली होती. अलीकडे सागरिका नसीरूद्दीन शहा यांच्या ‘इरादा’ या चित्रपटात दिसली होती. अलीकडे तिने क्रिकेटपटू जहीर खान याच्यासोबत साखरपुडा केला.लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे.
चित्राशी रावत
चित्राशी रावत हिने या चित्रपटात कोमल चौटाला नामक पात्र साकारले होते. या चित्रपटानंतर चित्राशी अनेक चित्रपट व टीव्ही शोमध्ये दिसली. तूर्तास ती ‘शंकर जय किशन’ या शोमध्ये दिसतेय.
शिल्पा शुक्ला
शाहरूखच्या हॉकी टीममध्ये बिंदिया नायक या खेळाडूच्या रूपात दिसलेली शिल्पा ‘बीए पास’ या चित्रपटात दिसली होती. पण यानंतर ती एकाही चित्रपटात झळकली नाही. चित्रपट सोडून शिल्पाने थिएटरकडे आपला मोर्चा वळवला आहे. अलीकडे महेश दत्तानीच्या ‘द बिग फॅट सिटी’ या सिनेप्लेमध्ये ती दिसली होती.
तान्या अबरोल
शाहरूखच्या टीममधील बलबीर कौर तुम्हाला आठवत असेलच. बलवीरची भूमिका साकारणारी तान्या सीआयडी व अशा काही मालिकेत दिसली. सध्या ती पंजाबी चित्रपटांसह काही वेब सीरिजमध्ये बिझी आहे.
शुभी मेहता
शुभी मेहता ही ‘चक दे इंडिया’मध्ये गुंजन लखानीच्या भूमिकेत दिसली होती. ‘आमरस’ या चित्रपटानंतर शुभी एका शॉर्टफिल्ममध्ये दिसली. सध्या म्हणाल तर शुभी एक बिझनेस वूमन बनली आहे. होय, गुडगावस्थित शुभीची कंपनी कार्पोरेट ट्रेनिंग देते.
विद्या मालवदे
शाहरूखच्या हॉकी टीममधील गोलकिपर विद्या शर्मा अर्थात विद्या मालवदे आता योगा इन्स्ट्रक्टर बनली आहे. जगभरात योगाभ्यास शिबीरे घेत ती फिरत असते.
सीमा आझमी (राणी डिस्पोटा)
सीमा आझमीचा स्वत:चा एक थिएटर ग्रूप आहे. यात ती लेखन, दिग्दर्शन व अभिनय करते.
मसोचोन
शाहरूखच्या टीममध्ये मौली जिमिक या मणिपुरी खेळाडूची भूमिका साकारणारी मसोचोन सध्या तिच्या मूळ गावी एका एनजीओत काम करतेय. लग्न करून आपल्या संसारात रमलेली मसोचोनला एक मुलगी आहे.
अनाइता नायर
आलिया बोसची व्यक्तिरेखा साकारणारी अनाइता हिने २०११ मध्ये लग्न केले आणि ती सिंगापूरला स्थायिक झाली. अनाइता आता एका मुलीची आई आहे.
आर्या मेनन
गुल इकबाल हे पात्र रंगवाणारी आर्याची स्वत:ची एक प्रॉडक्शन कंपनी आहे. यात ती अॅडफिल्म्स प्रोड्यूस करते.
सांडिया फर्टांडो
नेत्रा रेड्डी या खेळाडूची भूमिका साकारणारी सांडिया लग्न करून लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. ती पीआर प्रोफेशनल आहे.