Join us  

'मला यात ओढू नका'; विकी- कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 4:11 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
2 / 9
२०२१ च्या अखेरीस ही जोडी राजस्थानमधील एका मोठ्या पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
3 / 9
सोशल मीडियावर विकी- कतरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असतानाच अद्यापतरी या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडून या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
4 / 9
विकीच्या लग्नाची चर्चा रंगल्यापासून त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीदेखील चर्चेत आली आहे. प्रत्येकालाच या लग्नावर तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
5 / 9
हरलीनने कोणत्याही प्रसारमाध्यमांसमोर थेटपणे तिची प्रतिक्रिया जरी दिली नसली तरीदेखील तिने तिच्या मित्र-परिवारात तिची प्रतिक्रिया दिली आहे.
6 / 9
हरलीनच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, हरलीन तिच्या आयुष्यात पुढे मार्गस्थ झाली असून तिला जुन्या गोष्टींमध्ये अजिबात रमायचं नाही.
7 / 9
हरलीनच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, हरलीन तिच्या आयुष्यात पुढे मार्गस्थ झाली असून तिला जुन्या गोष्टींमध्ये अजिबात रमायचं नाही.
8 / 9
'विकी कोणाशी लग्न करतोय यात मला काडीमात्र रस नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांमध्ये मला ओढू नका', असं तिने तिच्या मित्रपरिवारात सांगितलं आहे.
9 / 9
हरलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लवकरच ती एकता कपूरच्या 'द टेस्टट केस 2' मध्ये झळकणार आहे.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफहरलीन सेठीसेलिब्रिटीबॉलिवूड