Aditya Rawal : चर्चा आदित्य रावलची...! पाहा परेश रावल यांच्या लेकाचे फोटो, दिसतो फारच हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 08:00 IST
1 / 8‘बाबू भैया’ म्हणजेच परेश रावल हे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते. त्यांचा अभिनय पाहून प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकाची चर्चा आहे.2 / 8होय, आम्ही बोलतोय ते परेश रावल यांचा मोठा मुलगा आदित्य रावल याच्याबद्दल. परेश यांना आदित्य व अनिरूद्ध अशी दोन मुलं आहेत. त्यापैकी आदित्य रावलची ‘आर या पार’ ही सीरिज नुकतीच रिलीज झाली.3 / 8‘आर या पार’ या सीरिजमध्ये आदित्यने सरजूची भूमिका साकारली आहे. यासाठी तो तिरंदाजी शिकला. 30 डिसेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज झाली. आहे.4 / 8‘बमफाड’ या सिनेमातून आदित्यचा बॉलिवूड डेब्यू झाला होता. त्याचा पहिला सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही. पण त्याच्या अभिनयाचं मात्र अपार कौतुक झालं.5 / 8आदित्य मल्टी टॅलेंटेड आहे. स्पोर्ट्समध्ये त्याला इंटरेस्ट जास्त आहे. आदित्य फुटबॉल खेळतो आणि यासोबतच त्याला लिहिण्याची आवड आहे. 6 / 8आदित्य रावल रवींद्रनाथ टागोर आणि शेक्सपीयरचा जबरा फॅन आहे. आदित्य अमेरिका आणि इंडियामध्ये डायरेक्टर्ससाठी स्क्रीनप्ले रायटरचे काम करतो. 7 / 8आदित्य हा एक उत्तम लेखक आहे. जियो सिनेमासाठी त्याने एक स्क्रिप्ट लिहिली आहे. या सिनेमात परेश रावल हेही दिसणार आहेत.8 / 8परेश रावलचा मुलगा असण्याचा काही फायदा मिळाला का? यावर आदित्य म्हणाला, मी परेश रावल यांचा मुलगा आहे, निश्चित याचे काही फायदे आहेत. मी सहज कुणाला भेटू शकतो. पण पुढचं सगळं तुमच्या टॅलेंटवर अवलंबून आहे.