Join us  

Networth: प्रत्येक शोमध्ये इमोशनल होणारी नेहा एका गाण्यासाठी चार्ज करते लाखो रुपये; वार्षिक उत्पन्न ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 3:14 PM

1 / 11
आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर.
2 / 11
आजवर नेहाने अनेक गाण्यांच्या जोरावर श्रोत्यांची मनं जिंकली. त्यामुळे नेहा आज लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.
3 / 11
संगीतविश्वात एक एक टप्पा पार करणाऱ्या नेहाचा आज मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
4 / 11
बऱ्याचदा नेहा तिच्या गाण्यासोबतच इमोशनल होणाऱ्या स्वभावामुळेही चर्चेत येते. अनेकदा तिला स्टेजवर रडू कोसळल्याचंही पाहायला मिळालं आहे.
5 / 11
नेहाने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचं एकूण नेटवर्थ किती, ती एका गाण्यासाठी किती फी चार्ज करते ते पाहुयात.
6 / 11
नेहा मुंबईत राहात असून पॅनोरोमा टॉवरमध्ये राहते. तिच्या या घराची किंमत १.२ कोटी रुपये आहे.
7 / 11
नेहाला लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्यामुळे तिच्याकडे Audi Q7, BMW अशा काही कारचं कलेक्शन आहे.
8 / 11
नेहाचं एक YouTube ब्लॉगिंग चॅनेलदेखील आहे. या चॅनेलवर जवळपास 100,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
9 / 11
नेहा प्रत्येक महिन्याला जवळपास ३० लाखांपेक्षा जास्त कमाई करते. एका गाण्यासाठी नेहा ८ ते १० लाख रुपये चार्ज करते.
10 / 11
सूत्रांच्या माहितीनुसार, नेहाचं 2022 चं नेटवर्थ जवळपास ३८ कोटी रुपये इतकं आहे.
11 / 11
नेहाने प्रसिद्ध पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केलं आहे. दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.
टॅग्स :नेहा कक्करसेलिब्रिटीटेलिव्हिजन