'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'सैयारा'च्या दिग्दर्शकाची पत्नी! इमरान हाश्मीसोबत केलंय काम, आता काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:40 IST
1 / 7मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करुन उदिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. उदिताने पूजा भट्ट दिग्दर्शित ‘पाप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली.2 / 7बॉलिवूडमध्ये असेही कलाकार आहेत जे आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून स्टार झाले. परंतु, कालांतराने हे कलाकार इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यातील एक नाव म्हणजे उदिता गोस्वामी. 3 / 7 'पाप' या चित्रपटातील 'लागी तुमसे मन की लगन' हे गाणं आजही अनेकांच्या ओठांवर असतं. या चित्रपटातील अभिनेत्री उदिता गोस्वामी काही वर्षांनंतर इंडस्ट्रीपासून दूर गेली. ती सध्या कुठे आहे, याबद्दल जाणून घ्या...4 / 7उदिताने तिच्या इमरान हाश्मीसोबत 'जहर' आणि 'अक्सर' हे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं. तिच्या बोल्ड सीन्सची सर्वत्र चर्चाही झाली.5 / 7त्याचबरोबर ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा होत्या. याशिवाय १०० सुंदर महिल्यांच्या यादीत तिने स्थान मिळवलं होतं.6 / 7जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर उदिताने आणि मोहित यांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला दोन मुले आहेत. 7 / 7अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर उदिताने डिस्क जॉकी म्हणजेच डिजे म्हणून स्वतःचं नवं करिअर सुरू केलं आहे.