कधी घराचं भाडं भरायला पैसे नसलेली अभिनेत्री आज तब्बल कोट्यावधींची मालकीण, मुलगाही प्रसिद्ध अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:15 IST
1 / 7या अभिनेत्रीला तुम्ही विविध सिनेमांमधून पाहिलं असेल. या अभिनेत्रीने राजेश खन्नांपासून मनोज वाजपेयींपर्यंत सर्वांसोबत काम केलंय. 2 / 7या अभिनेत्रीचं नाव आहे शर्मिला टागोर. शर्मिला या भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री असल्या तरीही एकवेळ असा होता की शर्मिला यांनी खूप हलाखीत आयुष्य काढलंय3 / 7शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. परंतु सुरुवातीला त्यांनी स्ट्रगलचा काळ बघितला. एकवेळ असं होता की घराचं भाडं भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. आज शर्मिला तब्बल २००० कोटींच्या मालकीण आहेत4 / 7शर्मिला टागोर यांनी १९६९ साली राजेश खन्नांसोबत आराधना सिनेमात काम केलं. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. त्यानंतर शर्मिला यांनी मागे वळून पाहिलं नाही5 / 7शर्मिला टागोर यांनी क्रिकेटपटू नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी नंतर लग्न केलं. लग्नानंतर शर्मिला या पतौडी खानदानाची सून झाल्या.6 / 7लग्नाआधीच शर्मिला यांचं फिल्मी करिअर शिखरावर होतं. अमर प्रेम, अनुपमा, तलाश, वक्त अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. शर्मिला यांचा मुलगा सैफ अली खानही आज लोकप्रिय अभिनेता आहे7 / 7२०२३ ला शर्मिला यांची भूमिका असलेला गुलमोहर सिनेमा खूप गाजला. यात त्यांनी मनोज वाजपेयींच्या आईची भूमिका साकारलेली. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली