Join us  

खिश्यात 6 रुपये घेऊन गाठली मुंबई, हॉटेलमध्ये घासली भांडणी; आज आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 9:05 AM

1 / 10
मुंबई मायानगरीत यावं आणि अभिनेता, अभिनेत्री व्हावं असं आज अनेक तरुण स्वप्न पाहतात. परंतु, हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होतं असं नाही. यासाठी बराच मोठा संघर्ष करावा लागतो. असाच संघर्ष एका बॉलिवूड अभिनेत्याने केला.
2 / 10
रोनित रॉय साऱ्यांनाच ठावूक आहे. छोट्या पडद्यावर त्याने त्याचा दबदबा निर्माण केला आहे. इतकंच कशाला बॉलिवूड सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
3 / 10
रोनित रॉय यांनी सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला. खिश्यात फक्त ६ रुपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली होती. रोनित आणि सुभाष घई यांची चांगली मैत्री होती. त्यामुळे जवळपास ४ वर्ष ते सुभाष घईंच्याच घरी राहिले.
4 / 10
सुभाष घईंच्या घरी राहत असताना त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. सोबतच ते मुंबईत कामदेखील शोधत होते.
5 / 10
मुंबईत आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी पडेल ते काम केलं. यात अगदी हॉटेलमध्ये भांडी सुद्धा घासली. दुसरीकडे त्यांनी मॉडेलिंग सुरु केलं.
6 / 10
हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांनी ६०० रुपये पहिला पगार मिळाला होता. जो त्यांनी आईला पाठवला होता.
7 / 10
रोनित रॉय यांनी जान तेरे नाम या सिनेमात पहिल्यांदा काम केलं. मात्र, त्याच्यानंतर ४-५ वर्ष त्यांच्याकडे काम नव्हतं.
8 / 10
छोट्या पडद्यावरील कसौटी जिंदगी की या मालिकेत मिस्टर बजाज ही भूमिका साकारुन ते प्रकाशझोतात आले. त्यानंतर 'क्योंकी सास भी कभी बहू थी' आणि 'अदालत'मध्ये त्यांनी काम केलं. आणि, त्यांच्या या भूमिका प्रचंड गाजल्या.
9 / 10
रोनित रॉयने 'उडान', '2 स्टेट्स', 'शूटआउट अॅट वडाला', 'मुन्ना मायकल' आणि 'उंगली' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
10 / 10
रोनित रॉय आज एक यशस्वी अभिनेता आहे. 2003 मध्ये त्यांनी मॉडेल आणि अभिनेत्री नीलम सिंगसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले आहेत.
टॅग्स :रोनित रॉयबॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा