मालदीवचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे तिथले समुद्र किनारे. इथला निळाशार सागरी किनारा कुणालाही मोहून टाकतो. मग प्रेमात बुडालेले बिपाशा आणि करणसुद्धा याला अपवाद कसे ठरतील. बिपाशानं मालदीवच्या नयनरम्य सागरी किना-याचा टिपलेला हा कोलाज. यातील एका फोटोत करणही पाहायला मिळतोय..
हनीमूनवर बिपाशा आणि करण फुलऑन रोमँटिक झालेत. हाच रोमँटिक अंदाज त्यांच्या बेडरुममध्ये स्पष्ट दिसून येतोय. बिपाशानं बेडला गुलाब फुलाच्या पाकळ्यांनी सजवलं आहे..
बिपाशाच्या हनीमूनमध्ये प्रत्येक दिवशी बेडरुम विविध पद्धतीनं सजवण्यात आलं. गुलाब पाकळ्यांनी सजवलेल्या बेडनंतर बिपाशानं बेडवर टॉवेल आर्टही पाहायला मिळालं.. टॉवेल आर्टमधून तयार केलेलं कार्टून आणि गुड नाईटचा संदेश असलेला फोटो बिप्सनं शेअर केला..
मालदीवच्या किना-यावर बिप्सनं पोहण्याचाही आनंद लुटला.. स्विमिंग कॉस्च्युममध्ये बिप्सचा हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल.. तिचा पती करण यालाही आपल्या भावना अनावर झाल्या.. त्यानं या फोटोवर कमेंट केली.. माझी पत्नी देवी आहे, मी लकी आहे का ? मात्र करणच्या या कमेंटची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवण्यात येतेय.