Join us  

कुठे आहे 'यस बॉस' चा सिद्धार्थ चौधरी? बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतरही जगतोय आलीशान लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 11:21 AM

1 / 8
अभिनेता शाहरुख खान आणि जुही चावला यांची मुख्य भूमिका असलेला येस बॉस चित्रपट आठवतो का? हा चित्रपट त्या काळी चांगलाच गाजला होता.
2 / 8
येस बॉस या चित्रपटात शाहरुख आणि जुही व्यतिरिक्त आणखी एक कलाकार झळकला होता. तो म्हणजे आदित्य पांचोली.
3 / 8
या चित्रपटात आदित्यने सिद्धार्थ चौधरी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा अभिनेता आज काल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो.
4 / 8
वयाच्या १८ व्या वर्षीच आदित्य पांचोली यांना यश, प्रसिद्ध सारं काही मिळालं होतं. परंतु, त्यांच्या स्वभावामुळे अनेकदा त्यांना करिअरमध्ये नुकसान सहन करावं लागलंय.
5 / 8
२००४ मध्ये संजय गुप्ता यांच्या मुसाफिर या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ६ वर्षांनी स्ट्राइकर या अॅक्शनपटातही ते झळकले.
6 / 8
आदित्य पांचोली हे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात अखेरचे दिसले. त्यानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला.
7 / 8
आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली कलाविश्वात सक्रीय आहे. तर, त्यांच्या लेकीचं सनाचं गोव्यात एक रेस्टॉरंट आहे.
8 / 8
अनेकदा आदित्य पांचोलीदेखील सनाच्या रेस्टॉरंटकडे लक्ष देतात.सध्या आदित्य पांचोली आणि त्यांची पत्नी जरीना हे मुंबईमध्येच राहतात. सोबतच त्यांचा मुलगा सूरजदेखीर राहतो. (photos: soorajpancholihero/ social media)
टॅग्स :आदित्य पांचोलीबॉलिवूडशाहरुख खानजुही चावला सिनेमा