Bigg Boss Marathi 3 : 'नाळ' फेम अभिनेत्री घेणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:17 IST
1 / 9बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोस. साहजिकच बिग बॉस मराठीच्या घरात कोण कोण जाणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तूर्तास एका नावाची जोरदार चर्चा आहे.2 / 9होय, लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती देवी उर्फ दीप्ती श्रीकांत ‘बिग बॉस मराठी’च्या तिस-या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 3 / 9दीप्ती छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा आहे. मला सासू हवी या मालिकेतील सूनेच्या व्यक्तिरेखेमुळे दीप्ती घराघरात पोहोचली होती.4 / 9दीप्ती श्रीकांत देवी ही मूळ गुजराती आहे. तिचा जन्म पुण्याचा. 2006 मध्ये दीप्तीने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 5 / 9अवघाचि संसार या मालिकेत तिने साकारलेली अंतरा ही व्यक्तिरेखा गाजली होती. त्यानंतर अंतरपाट, मला सासू हवी यासारख्या मालिकांमध्ये ती झळकली.6 / 9 पक पक पकाक या चित्रपटातून दीप्तीला मराठी सिनेमात डेब्यू केला. पाठोपाठ ‘समर - एक संघर्ष’ या चित्रपटातही ती दिसली.7 / 9 नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘नाळ’ सिनेमातील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेली होती.8 / 9हिंदी मालिकाही तिने गाजवल्या. परिवार - कर्तव्य की परीक्षा, बडे अच्छे लगते है या सारख्या हिंदी मालिकाही तिने केल्या आहेत.9 / 9 दीप्ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे एक लाख वीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.