PICS : ‘शाह’ आणि मराठमोळी कशी? कोण आहे ‘बिग बॉस मराठी3’ची स्पर्धक मिनल शाह?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:46 IST
1 / 8अनेक दिवस प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरणा-या ‘बिग बॉस मराठी3’चे स्पर्धक कोण असणार यावरून आता पडदा उठला आहे. 2 / 8मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर नशीब आजमावणा-या अनेक लोकप्रिय कलाकारांचा या सिजनमध्ये समावेश आहे, यातल्याच एका चेह-याला तुम्ही एमटीव्हीवरच्या रोडिजमध्ये पाहिलं असेल. होय ती कोण तर मिनल शाह.3 / 8 मुंबईची मराठमोळी मुलगी मिनल शाह हिचा देखील या स्पर्धकांमध्ये समावेश आहे. आता ‘शाह’ आणि मराठमोळी कशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आज तेच तुम्हाला सांगणार आहोत.4 / 8मिनलचे शालेय शिक्षण हे वांद्रे पूर्व येथील आयईएस न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मराठी माध्यमात झाले आहे. लहानपणापासूनच तिच्यावर मराठी संस्कृती आणि भाषेचे संस्कार झालेत.5 / 8मिनलचे वडील गुजराती. पण आई मराठी असल्यामुळे, आईने अगदी जाणीवपूर्वक मीनलवर मराठी संस्कार केलेत. तिला मराठमोळ्या संस्कृतीत रूळवलं.6 / 8मिनल लहान असताना तिचे आई वडील वेगळे झाले होते. तेव्हापासून ती आणि तिचा भाऊ आईसोबत राहत आहेत.7 / 8मिनल ही एमटीव्ही रोडीज स्टार असून, तिने अनेक कठीण स्टंट करून सेमीफायनल मध्ये जागा मिळवली होती.8 / 8मिनल सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ‘बिग बॉस मराठी3’मध्ये मिनल काय कमाल करते हे पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे.