1 / 7बिग बॉस 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस मराठी २'ची घोषणा झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. बिग बॉसचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. 2 / 7बिग बॉस मराठीचे घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केलं आहे. हे घर तब्बल 14000 स्केवअर फुटांवर केले आहे.3 / 7पहिल्यांदाच मराठी बिग बॉसमध्ये जेल तयार करण्यात आली आहे. याला अडगळीची खोली असं नाव देण्यात आले आहे. 4 / 7गार्डन एरियामध्ये तुळशी वृंदावन, स्वीमिंग पूल अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 5 / 7अतिशय प्रशस्त किचन बिग बॉसच्या घरात उभारण्यात आले आहे. किचनमध्ये चिनी मातीच्या भांड्याचा वापर करण्यात आले आहे6 / 7मुलांच्या बेडरुममध्ये मोठ्या आकाराची घुंगरूची पट्टी लावण्यात आलेली आहे ज्यामुळे खोलीची शोभा आणखी वाढली आहे. 7 / 7मुलांच्या बेडरुममध्ये सुंदर रंगसंगीतांचा वापर करुन ती डेकोरेट करण्यात आली आहे