Join us  

Bigg Boss 16 Premiere : होणार फुल्ल राडा...! शिव ठाकरे, साजिद खान, टीना दत्ता..., हे आहेत बिग बॉसचे 16 स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 12:13 AM

1 / 15
निमरित कौर अहुवालिया ही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारी पहिली स्पर्धक ठरली. छोटी सरदारनी फेम निमरित कौर अहुवालिया ही बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. डेली सोपमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी निमरित बिग बॉसचा शो कसा गाजवणार, हे तर येणारा काळच सांगेल.
2 / 15
तजाकिस्तानचा गायक अब्दु रोझिक हा बिग बॉसच्या घरात जाणारा दुसरा स्पर्धक ठरला. अब्दुला पाहिलं की तो आठ वर्षाच्या मुलाइतकाच दिसतो, पण त्याचं खरं वय हे नाहीय. तो 19 वर्षांचा आहे. तजाकिस्तानचा हा लोकप्रिय चेहरा आणि आवाज आज जागतिक सेलिब्रिटी स्टार झाला आहे. त्याच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद आहे. अब्दुचं ओही दिली झोर हे गाणं जगातील संगीतप्रेमींनी डोक्यावर घेतलं आहे.
3 / 15
बिग बॉसच्या घरात ‘उडारिया’ फेम प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता हे कपल बिग बॉसच्या घरात दाखल झालं. उडारिया सीरिअलमध्ये दोघांनी तेजू व फतेहची भूमिका साकारली आहे. बिग बॉसच्या मंचावर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं दोघांनी सांगितलं. पण एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते., असं म्हणत दोघांची पोलखोल केलीच.
4 / 15
रॅपर MC Stan हा बिग बॉसच्या घरात जाणारा पाचवा स्पर्धक ठरला. आपल्या युनिक हेअरस्टाईल व लुकमुळे त्याने येताच सलमानचं मन जिंकलं. मी पुण्याच्या वस्तीत राहणारा मुलगा आहे. माझ्याविरोधात ज्या कॉन्ट्रोव्हर्सी सुरू आहेत, त्यावर मी बोलू इच्छितो, असं तो म्हणाला. त्याचं खरं नाव अल्ताफ आहे.
5 / 15
मॉडल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी अर्चना गौतम बिग बॉसच्या घरात आली आहे. बिकिनी गर्ल म्हणून परिचित असलेल्या अर्चना गौतमची राजकीय नेता अशीही ओळख आहे. काँग्रेसच्या तिकिटावर तिने हस्तिनापूर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण तिचा पराभव झाला होता. अर्चनाने मिस बिकिनी 208 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
6 / 15
गौतम विग हा अभिनेता आहे. ब-याच दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती. अखेर बिग बॉसच्या घरात त्याची एन्ट्री झाली.
7 / 15
शालीन भनोट हे टीव्ही इंडस्ट्रीचं मोठं नाव आहे. नागिन, दो हंसो का जोडा, ये है आशिकी अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं. बिग बॉसचा होस्ट बनायचं त्याचं स्वप्नं आहे.
8 / 15
सौंदर्या शर्मा बिग बॉसच्या घरात ग्लॅमरचा तडका लावणार आहे. ती एक मॉडेल व अभिनेत्री आहे. तिने हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे.
9 / 15
बिग बॉस मराठी 2चा विजेता शिव ठाकरे हा मराठी मुलगाही बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. शिव ठाकरेला पाहण्यास साहजिकच चाहते उत्सुक आहेत.
10 / 15
इमली फेम सुंबुल तौकीर ही सुद्धा बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. इमली या मालिकेने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
11 / 15
मान्या सिंग ही फेमिना मिस इंडिया 2020 ची रनरअप हिचीही बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. रिक्षाचालकाच्या या मुलीचा मिस इंडिया रनरअप बनण्यापर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे.
12 / 15
हरियाणाची डान्सर गोरी नागोरी हिनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. ले फोटत्ते ले हे तिने गायलेलं गाणं तुफान हिट झालं आणि ती घराघरात फेमस झाली.
13 / 15
टीना दत्ता ही उतरन या मालिकेतून घराघरात पोहोचली. यानंतर ती खतरों के खिलाडी व नागिनमध्ये दिसली़ आता ती बिग बॉसच्या घरात धम्माल करताना दिसणार आहे.
14 / 15
टीना दत्तासोबत श्रीजिता डे हिचीही बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली. तिने उतरन या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारली होती.
15 / 15
दिग्दर्शक साजिद खान हा देखील बिग बॉसचा भाग असणार आहे. फराह खानचा भाऊ साजिद मी टू आरोपांमुळे वादात सापडला होता. आता बिग बॉसच्या घरात तो याबद्दल काय काय खुलासे करतो ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.
टॅग्स :बिग बॉससलमान खानशीव ठाकरेटिना दत्तासाजिद खान