Join us  

रणवीरपूर्वी 'या' कलाकारांनीही केलंय न्यूड फोटोशूट; 'सैराट'फेम अभिनेत्याचाही आहे यात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 4:16 PM

1 / 10
अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे.
2 / 10
अलिकडेच रणवीरने एक फोटोशूट केलं असून या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
3 / 10
अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. तर, काहींनी त्याला पाठिंबाही दिला आहे. यामध्येच सध्या रणवीरपूर्वी न्यूड फोटोशूट केलेल्या कलाकारांची चर्चा रंगली आहे.
4 / 10
राधिका आपटे - मराठीसह बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या राधिकाने बोल्ड सीनसह न्यूड फोटोशूटही केलं आहे.
5 / 10
सनी लिओनी - पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडची पायरी चढणारी सनीदेखील अनेकदा न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
6 / 10
आमिर खान - मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान यानेही यापूर्वी न्यूड फोटोशूट केलं आहे. पीके या चित्रपटात आमिर न्यूड लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आला होता.
7 / 10
वनिता खरात- आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी वनिता खरातने मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बॉडी शेमिंगला सामोऱ्या जाणाऱ्या वनिताने न्यूड फोटोशूट करुन ट्रोलर्सच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं होतं.
8 / 10
मिलिंद सोमण - मॉडलिंग क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव म्हणजे मिलिंद सोमण. फिटनेसमुळे चर्चेत येणारा मिलिंद त्याच्या बोल्ड फोटोमुळेही चर्चेत आला आहे. रणवीरपूर्वी त्याने असंच न्यूड फोटोशूट केलं होतं.
9 / 10
इशा गुप्ता - बऱ्याचदा बोल्ड सीनमुळे चर्चेत येणारी इशा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यात तिने न्यूड फोटोसह, शर्टलेस फोटोही शेअर केले आहे.
10 / 10
तानाजी गलगुंडे - सैराट या चित्रपटात लंगड्या ही भूमिका साकारणाऱ्या तानाजी गलगुंडे याने न्यूडसह शर्टलेस फोटोशूट केलं आहे. त्याचं हे फोटोशूट प्रेक्षकांना थक्क करणारं होतं.
टॅग्स :रणवीर सिंगमिलिंद सोमण इशा गुप्ताआमिर खानबॉलिवूडसिनेमा