१० वर्षात इतकी बदललीय 'बजरंंगी भाईजान'ची मुन्नी, आता ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:20 IST
1 / 9दिग्दर्शक कबीर खान यांचा ऑलटाइम ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट केवळ सुपरस्टार सलमान खानच्या कारकिर्दीतीलच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतीलही एक सुपरहिट चित्रपट आहे. 2 / 9२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला लवकरच १० वर्षे पूर्ण होतील. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने बालकलाकार म्हणून पाकिस्तानी लहान मुलीची मुन्नीची भूमिका साकारली होती.3 / 9बजरंगी भाईजानची मुन्नी म्हणून हर्षालीला चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का की सध्या तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे.4 / 9सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात हर्षाली मल्होत्राने पाकिस्तानी शाहिदाची भूमिका साकारली होती, जी बोलू शकत नाही. पण तिच्या गोंडस लूकने आणि अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 5 / 9यानंतर हर्षाली एका रात्रीत स्टार बनली. पण आता १० वर्षांनंतर, बजरंगी भाईजानची मुन्नी मोठी झाली आहे आणि तिच्या गोंडसपणासोबतच ती आता खूप सुंदरही दिसते.6 / 9हर्षाली मल्होत्राने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसतो आहे.7 / 9हर्षालीचे हे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की बजरंगी भाईजानची छोटी मुन्नी आता खूप मोठी झाली आहे आणि काळानुसार तिचा लूकही खूप बदलला आहे.8 / 9एकंदरीत, हर्षाली मल्होत्राचे हे फोटो खूपच अप्रतिम आहेत, तुम्हीही त्यांच्यावरून नजर हटवू शकणार नाही. १६ वर्षीय हर्षालीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांनाही खूप आवडत आहेत.9 / 9सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. अलिकडेच, चित्रपटाचे लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी बजरंगी भाईजान भाग २ च्या पटकथेबद्दल एक मोठा खुलासा केला आणि सांगितले की सलमान आम्हाला भेटला. चित्रपटाच्या सिक्वेलच्या कथेचे अर्धे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.