Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बाहुबलीमधील हा अभिनेता होता वेटर, सिक्युरीटी गार्डचे देखील केले आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 18:49 IST

1 / 6
बाहुबली या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटातील बिज्जलदेवची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
2 / 6
बाहुबली या चित्रपटात नास्सरने बिज्जलदेवची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता.
3 / 6
नास्सरने बाहुबलीच्याआधी चाची 420 या हिंदी चित्रपटात काम केले होते.
4 / 6
नास्सर हा केवळ प्रसिद्ध अभिनेताच नाहीये तर प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक आहे. त्याने 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता बाहुबली या चित्रपटामुळे मिळाली.
5 / 6
नास्सरला आज चांगलीच लोकप्रियता मिळाली असली तरी त्याने सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला आहे. तो चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. तसेच त्याने सिक्युरीटी गार्ड म्हणून देखील काम केले आहे.
6 / 6
नास्सरने 1985 पासून त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या अनेक चित्रपटांमध्ये तो छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकला आहे.
टॅग्स :बाहुबली