Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : या बॉलिवूड स्टार्सच्या घराची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 08:00 IST

1 / 8
तुमचे आवडते स्टार्स ज्या घरात राहतात, त्या घराची किंमत तुम्हाला महितीये? या यादीतील पहिले नाव आहे महानायक अमिताभ बच्चन यांचे. अमिताभ यांचे जलसा आणि प्रतीक्षा असे दोन बंगले आहे. अमिताभ आपल्या कुटुंबासोबत जलसा या बंगल्यात राहतात. याची किंमत सुमारे 150 कोटी आहे आणि प्रतीक्षाची किंमत 80 कोटींच्या घरात आहे. जलसा हा बंगला अमिताभ यांना दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी गिफ्ट केला होता.
2 / 8
शाहरूख खानच्या बंगल्याचे नाव मन्नत आहे. याची किंमत 200 कोटींच्या घरात आहे. नुकताच हा बंगला कितीमध्ये विकशील का असा प्रश्न एका चाहत्याने शाहरूखला केला होता. यावर ‘मन्नत लोगों के आगे सिर झुकाने से मिलती है,’ असे उत्तर शाहरूखने दिले होते.
3 / 8
सलमान खान वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटमध्ये सलमानचे दोन फ्लॅट आहेत. याची किंमत 60 कोटींच्या घरात आहेत. सलमान ग्राऊंड फ्लोरवर राहतो तर त्याचे आई-वडील पहिल्या माळ्यावर राहतो.
4 / 8
आमिर खान बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आहे. त्याचे घरही अगदी परफेक्ट आहे. आमिर वांद्र्याच्या बेला विजटा अपार्टमेंटमध्ये राहतो. याची किंमत जवळपास 70 कोटी रूपये सांगितली जाते.
5 / 8
सैफ अली खान बेगम करिना कपूर खानसोबत वांद्रे येथील फॉर्च्युन हाईट्समध्ये राहतो. याची किंमत सुमारे 60 कोटींच्या घरात आहे. लवकरच सैफ हे घर सोडून नव्या घरात राहायला जाणार असल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते.
6 / 8
अक्षय कुमारचे घर म्हणजे अलिशान ड्युप्लेक्स आहे. जुहू बीचवर केलेल्या त्याच्या या घराचे संपूर्ण इंटिरिअर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने केले आहे. या घराची किंमत 100 कोटी रूपये आहे.
7 / 8
हृतिक रोशन आधी अक्षय कुमारचा शेजारी होता. अलीकडे हृतिकने जुहूमध्ये दोन फ्लॅट खरेदी केलेत. याची किंमत 97 कोटी रूपये असल्याचे कळते.
8 / 8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र सध्या त्यांच्या फार्महाऊसवर मुक्कामाला असतात. इथे ते शेती करतात. लोणावळ्यरतील या फार्महाऊसची नेमकी किंमत माहित नाही. पण ती कोटींच्या घरात आहे, इतके नक्की.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनसलमान खानशाहरुख खान