Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:57 IST

1 / 6
बॉलिवूड निर्माता साजिद नाडियाडवाला याचा नवा सिनेमा ‘तडप’ उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. या चित्रपटातून साजिद नाडियाडवाल अहान शेट्टीला लॉन्च करत आहेत. याआधीही साजिद यांनी अनेकांना संधी दिली आहे.
2 / 6
साजिद नाडियाडवाला अहानला लॉन्च करत आहे. खास म्हणजे अहानचा बाबाला म्हणजेच सुनील शेट्टीलाही साजिदनं ब्रेक दिला होता. सुनील शेट्टीला लुक्समुळे अनेक नकार पचवावे लागले, अशावेळी साजिदने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला ‘वक्त हमारा है’साठी साईन केलं होतं. सुनीलला पहिला चेक साजिदकडून आला होता. तीन दशकानंतर साजिद सुनीलच्या लेकाला लॉन्च करतोय.
3 / 6
जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ यालाही साजिद नाडियाडवाला यानेच लॉन्च केलं होतं. नाडियाडवाला बॅनरखाली बनलेला ‘हिरोपंती’ हा टायगरचा पहिला सिनेमा होता.
4 / 6
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन हिलाही साजिद नाडियाडवाडा यांनीच ब्रेक दिला होता. हिरोपंती या चित्रपटातूनच क्रितीचा डेब्यू झाला होता.
5 / 6
जॅकलिन फर्नांडीस हिचा डेब्यू साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटातून झालेला नाही. पण हो, नाडियाडवाला बॅनरच्या ‘हाऊसफुल’ या चित्रपटानं जॅकलिनचं नशीब मात्र बदललं होतं. यानंतर हाऊसफुल 2 व किकसाठी सुद्धा त्याने जॅकलिनला साईन केलं.
6 / 6
निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शक साजिद खान यालाही दिग्दर्शक म्हणून पहिला ब्रेक दिला. हाऊसफुल हा सिनेमा साजिद खानचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता.
टॅग्स :साजिद नाडियाडवालासुनील शेट्टीअहान शेट्टी