Join us  

फरहान अख्तरशी विवाह केल्यानंतर शिबानी दांडेकरने सोशल मीडियावर बदललं आपलं नाव, आता या नावाने ओखळली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:50 AM

1 / 6
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्न केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्याला काही सेलेब्रिटी आणि कुटुंबातील मंडळी उपस्थित होती.
2 / 6
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी १९ फेब्रुवारी रोजी विवाह केला.
3 / 6
आता विवाहानंतर शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर आपल्या नावासमोर फरहान अख्तरचं आडनाव लावलं आहे. आता तिचं नाव शिबानी दांडेकर-अख्तर आहे. त्याच्यासोबत बायोमध्ये मिसेस अख्तर लिहिले आहे.
4 / 6
हल्लीच शिबानी आणि फरहान यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये शिबानी आणि फरहान अख्तर हातात मेहंदी लावलेले दिसत होते.
5 / 6
शिबानीने विवाहामध्ये रेड कलरचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर फरहानने ब्लॅक कलरचा सूट परधान केला होता.
6 / 6
शिबानी आणि फरहान अख्तर बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तसेच त्यांनी आता विवाह करून नात्याला अधिकृत रूप दिले आहे.
टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकरलग्नबॉलिवूड