Join us  

विवाहित असूनही हे दिग्गज अभिनेते पडले प्रेमात, त्यांच्या अफेअर्सची झाली जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 4:45 PM

1 / 7
लव्ह, अफेअर, लिंकअप, ब्रेकअप ह्या बॉलिवूडमधील कलाकारांसाठी सामान्य गोष्टी आहेत. मात्र चित्रपटप्रेमींमध्ये त्याची खूप चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही दिग्गज अभिनेत्यांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे विवाहित असूनही प्रेमात पडले आणि त्यांच्या अफेअर्सचीही जोरदार चर्चा झाली.
2 / 7
बॉलिवूडमधील शोमॅन राज कपूर यांनी कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी कपूर कुटुंबाला बऱ्यापैकी सांभाळले. फिल्मी जगतापासून दूर राहत कृष्णा कपूर ह्या घर सांभाळत राहिल्या. मात्र या काळात राज कपूर हे अभिनेत्री नर्गिस यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्याशी विवाह करण्याचाही राज कपूर यांचा विचार होता. मात्र हे प्रेमप्रकरण पूर्णत्वास गेले नाही.
3 / 7
धर्मेंद्र यांना सिनेमात काम करण्याची जबर इच्छा होती. ते जेव्हा करिअर घडवण्यासाठी मुंबईत आले तेव्हा ते विवाहित होते. तसेच त्यांना मुलंही झाली होती. मात्र असं असूनही सिनेसृष्टीत जम बसवल्यावर ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र हे विवाहित आहेत हे हेमा मालिनी यांनाही माहिती होते. मात्र तरीही त्यांनी धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला होता.
4 / 7
धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल यांनी बेताब चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अमृता सिंह त्यांची सहकलाकार होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी सनी हे विवाहित आहेत हे कुणाला माहिती नव्हते. मात्र ही बाब जेव्हा समोर आली तेव्हा अमृता सिंह या त्याच्यापासून दूर झाल्या.
5 / 7
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी सर्वांना माहिती आहे. मात्र डॉन चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, शाहरुख खानची प्रियंका चोप्रासोबत जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ही बाब जेव्हा गौरी खानला समजली तेव्हा ती खूप नाराज झाली. त्यानंतर शाहरुख खानने प्रियंका चोप्रासोबत पुन्हा कधीही काम केलं नाही.
6 / 7
शाहरुख खानच नाही तर अक्षय कुमारसोबतही प्रियंका चोप्राचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र ही गोष्ट समजताच ट्विंकल खन्नाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यानंतर ट्विंकलने अक्षय कुमारला स्पष्ट शब्दात खडसावले होते. पुढे अक्षय आणि प्रियंका कधीही एकत्र दिसले नाहीत.
7 / 7
अभिनेता हृतिक रोशन आणि कंगाना राणौत यांच्यात झालेला वाद सर्वश्रृत आहे. क्रिश ३ चित्रपटादरम्यान, आपलं आणि हृतिक रोशनचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं, असा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिक ही गोष्ट नेहमीच नाकारत आला आहे. याच कारणामुळे सुझैन खान हृतिक रोशनपासून वेगळी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
टॅग्स :राज कपूरधमेंद्रशाहरुख खानअक्षय कुमारहृतिक रोशन