Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कितीतरी लोकांचा ऑपरेशन टेबलवर मृत्यू होतो", बोटॉक्स सर्जरीवर प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:08 IST

1 / 9
मनोरंजनसृष्टीत अभिनेत्रींनी सुंदरच दिसलं पाहिजे अशी सतत अपेक्षा केली जाते. म्हातारपणी त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जरी आल्या तरी त्यांना काम मिळणं कठीण होतं.
2 / 9
तजेलदार त्वचेसाठी, नाक, डोळे, ओठ व्यवस्थित करण्यासाठी अनेक कलाकार बोटॉक्स सर्जरीचा पर्याय निवडतात. जो पाहायला गेलं तर खूप धोकादायक असतो.
3 / 9
नुकतंच अभिनेत्री संदीपा धरने (Sandeepa Dhar) यावर भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीतली असूनही तिने या सर्जरी न करण्याचाच सल्ला दिला आहे. तसंच आपली शरीर, त्वचा जसं आहे तसं स्वीकारा आणि वयानुसार होणारे बदलही स्वीकारा असं ती म्हणाली आहे.
4 / 9
'टेली चक्कर'शी बोलताना संदीपा धर म्हणाली,'वाढतं वय ही एक समस्या आहे. का को जाणे पण अभिनेत्रींच्या करिअरची शेल्फ लाईफ असते असं सतत त्यांना सांगितलं जातं. तसंच हे व्हिज्युअल माध्यम असल्याने आमच्याकडून परफेक्ट, सुंदर दिसण्याचीच अपेक्षा असते.'
5 / 9
'जसं जसं तुम्ही मोठे होता चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात जे नैसर्गिक आहे. तुम्ही म्हातारे होणं हे वास्तवात बघितलं तर सुंदर गोष्ट आहे. मात्र इंडस्ट्री कायम याकडे चुकीच्याच नजरेने बघते.'
6 / 9
मला आता जाणीव होत आहे की माझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेष ही माझ्या भूमिकेत आणखी चमक आणू शकते. मला २१ वर्षांची तरुणी दिसण्यासाठी सर्जरी किंवा इंजेक्शन घेण्याची गरज नाही. मी २१ वर्षांची नाहीए.'
7 / 9
'मला दु:ख होतं जेव्हा अभिनेत्री म्हणतात की त्यांनी बरेचदा बोटॉक्स केलं आहे. यात काय मोठं आहे असं त्यांना वाटतं. पण ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडून प्रेरणा अनेक मुली कशाही पद्धतीने पैसे जमा करुन अशा सर्जरी करायला जातात.'
8 / 9
'पण वास्तविक पाहता ऑपरेशन टेबलवर किती लोकांचा मृत्यू होतो याची कल्पना आहे का? हे खूप धोकादायक आहे. शेवटी ही एक सर्जरीच आहे.'
9 / 9
'जर तुमच्या जीवालाच धोका आहे तर तुम्ही सर्जरी करा. अन्यथा अशा सर्जरींची गरजच नाही.' अभिनेत्री संदीपा धर 'इसी लाईफ मे','हिरोपंती','कागज','दबंग २' या सिनेमांमध्ये दिसली आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड